शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

सोलापूरसह पुणे, सातारा जिल्ह्यात ६० साखर कारखान्यांकडे एफआरपीचे थकले १३८५ कोटी

By appasaheb.patil | Updated: December 20, 2018 16:31 IST

एफआरपी रक्कम: आरआरसी कारवाईची साखर आयुक्तांकडे शिफारस

ठळक मुद्देकायद्यानुसार एफआरपी थकविणाºया कारखान्यांवर कारवाई केली जाईल - सुभाष देशमुखसाखर कारखानदारी अडचणीत आहे हे खरे असले तरी शेतकºयांचे पैसे वेळेवर मिळाले पाहिजेत, हा शासनाचा आग्रह राहणार आहे - सुभाष देशमुख

सोलापूर : पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील एफआरपी (रास्त किफायतशीर दर) थकविणाºया साखर कारखान्यांची आरआरसीनुसार(महसुली कायदा) कारवाई करण्याची शिफारस पुणे विभागीय सहसंचालक कार्यालयाने साखर आयुक्तांकडे केली आहे. विभागातील ६० कारखान्यांकडे १३८४ कोटी ७९ लाख रुपये इतकी रक्कम थकली आहे.

पुणे विभागातील ६२ साखर कारखान्यांनी यावर्षी गाळप सुरू केले असून, दोन कारखान्यांनी अहवाल दिला नाही. ६० पैकी एकाही कारखान्याने नियमानुसार एफआरपी दिली नसल्याचे सहसंचालकाच्या पत्रात म्हटले आहे. एक नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत पुणे, सातारा व सोेलापूर जिल्ह्यातील ६० कारखान्यांनी ८८ लाख ५५ हजार ९६१ मे. टन गाळप केले आहे. या कारखान्यांनी एक महिन्यात गाळपाला आणलेल्या उसाचे एफआरपीनुसार २१४२ कोटी ७ लाख रुपये देणे आहे; मात्र यापैकी २९ साखर कारखान्यांनी ७५७ कोटी ९७ लाख रुपये दिले आहेत. ३१ कारखान्यांनी अद्याप एक रुपयाही शेतकºयांना दिला नाही. एकूणच ६० कारखान्यांकडे १३८४ कोटी ७९ लाख रुपये एफआरपीचे देणे अडकले आहेत. २९ साखर कारखान्यांनी एफआरपीच्या सरासरी ३५ टक्के रक्कम शेतकºयांना दिली आहे. ३१ कारखान्यांनी  एक दमडाही अद्याप दिला नसल्याचे साखर आयुक्तांना दिलेल्या पत्रात दिसत आहे.

सहसंचालकांनी दिला अहवाल 

  • - १५ डिसेंबरच्या माहितीनुसार पुणे सहसंचालकांनी साखर आयुक्तांना १८ डिसेंबर रोजी आरआरसी कारवाई करण्याचे पत्र आॅनलाईन दिले आहे.
  • - सातारा जिल्ह्यातील सर्वच    १३ कारखान्यांनी अद्याप एक रुपयाही दिलेला नाही.
  • - पुणे जिल्ह्यातील १७ कारखान्यांपैकी १३ कारखान्यांनी एफआरपीपोटी काहीअंशी रक्कम दिली असून चार कारखान्यांनी काहीही रक्कम दिली नाही.
  • - सोलापूर जिल्ह्यातील ३० पैकी १६ साखर कारखान्यांनी एफआरपीपोटी काही रक्कम दिली आहे.

गोकुळ माऊली, वसंतराव काळे आघाडीवर - पुणे विभागात गोकुळ माऊली शुगरने एफआरपीच्या  ९२ टक्के, सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याने ९० टक्के रक्कम शेतकºयांना दिली आहे. विठ्ठलराव शिंदे व भीमा सहकारी प्रत्येकी ८३ टक्के,पांडुरंग व संत तुकाराम प्रत्येकी ८२ टक्के, सोमेश्वर व आदिनाथ प्रत्येकी ८० टक्के, पराग ८१ टक्के,बारामती अ‍ॅग्रो ५८ टक्के,जकराया ५४ व इंद्रेश्वर कारखान्याने ५२ टक्के रक्कम दिली आहे. 

साखर कारखानदारी अडचणीत आहे हे खरे असले तरी शेतकºयांचे पैसे वेळेवर मिळाले पाहिजेत, हा शासनाचा आग्रह राहणार आहे. कायद्यानुसार एफआरपी थकविणाºया कारखान्यांवर कारवाई केली जाईल.- सुभाष देशमुख, सहकार व पणन मंत्री 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती