शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

शेटे वाड्यातील योगदंडाची पूजेने सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेतील धार्मिक विधीस प्रारंभ, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अन्य मान्यवरांची पूजेस हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:30 PM

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या हातातील योगदंडाच्या पूजेने यात्रेतील धार्मिक विधीस प्रारंभ झाला़ शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्र शेटे यांच्या घरात हा विधी पार पडला़

ठळक मुद्देसिद्धरामेश्वरांनी दिली सर्वधर्माची शिकवण : सुशीलकुमार शिंदेसर्वांच्या आशा, आकांक्षा, इच्छा पूर्ण होऊ दे़ सिद्धेश्वरांप्रति कृतज्ञतेची भावना शिंदे परिवार दरवर्षी व्यक्त करीत असतो़ : आ़ प्रणिती शिंदेआम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो की, या यात्रेच्या धार्मिक विधीचा मान आम्हाला मिळाला़ : अ‍ॅड़ मिलिंद थोबडे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या हातातील योगदंडाच्या पूजेने यात्रेतील धार्मिक विधीस प्रारंभ झाला़ शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्र शेटे यांच्या घरात हा विधी पार पडला़अक्षता सोहळ्याच्या आधी नववधूवरांना पाहुण्यांच्या घरी बोलावून जेवण घालण्याची प्रथा, परंपरा आहे़ शिवयोगी सिद्धेश्वर महाराज सुमारे नऊशे वर्षांपूर्वी कै. रामचंद्र शेटे यांच्या वाड्यात येऊन जेवण केले होते़ तीच परंपरा आजही कायम ठेवून सिद्धेश्वरांच्या हातातील योगदंड केळवणीसाठी शेटे यांच्या वाड्यात आणून केळीच्या पानात पुरण-पोळीचा नैवेद्य दाखवून मनोभावे विधिवत पूजा करण्यात आली़ बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास मानकरी शिवशंकर कंठीकर हे उत्तर कसब्यातील शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सिद्धेश्वरांच्या हातातील योगदंड कै. शेटे यांच्या वाड्यात घेऊन आले़ यावेळी मानकरी हिरेहब्बू शेटे वाड्यात आल्यानंतर योगदंडाला चौरंगी पाटावर ठेवून, विभूती, कुंकूम, फुले वाहून संबळाच्या निनादात विधिवत पूजा करण्यात आली़ यावेळी होमहवन करण्यात आले. शेटे यांचे वारसदार  व मिलिंद थोबडे यांचा मुलगा अ‍ॅड़ रितेश थोबडे यांनी हिरेहब्बू यांची पाद्यपूजा केली़केळीच्या पानात योगदंडास नैवेद्य दाखविण्यात आला़ यावेळी अ‍ॅड़ मिलिंद थोबडे यांच्या आई विजया थोबडे, सुचेता थोबडे, ललिता थोबडे, मल्लिका थोबडे, महेश थोबडे, राजशेखर हिरेहब्बू, आनंद हब्बू, संदेश भोगडे, विजयकुमार हब्बू आदी उपस्थित होते़ शेटे यांचे वारसदार अ‍ॅड़ मिलिंद थोबडे यांचा १९८७ पासून सिद्धेश्वरांच्या हातातील योगदंडाची पूजा करण्याचा मान आहे़ योगदंडाच्या पूजनाला जानेवारी २०१२ साली अ‍ॅड़ मिलिंद थोबडे २५ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांनी आपले वारसदार व मुलगा अ‍ॅड़ रितेश थोबडे यांच्याकडे पूजा करण्याचा मान सुपूर्द केला़ ---------------------सिद्धरामेश्वरांनी दिली सर्वधर्माची शिकवण- योगदंडाच्या पूजेला मला हजर राहता आले हे माझे भाग्य समजतो़ १०० वर्षांपूर्वी बांधलेल्या या शेटे वाड्यात ही पूजा होत आहे़ मी आज सोलापुरात असल्यामुळे या पूजेला येऊ शकलो़ सिद्धरामेश्वरांच्या आशीर्वादाने आपण सोलापूरकरांना चांगले दिवस आले आहेत़ सिद्धेश्वरांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली़ हीच शिकवण आपणाला उत्साहित करून प्रेरणा देत असते, अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.---------------श्री सिद्धरामेश्वर यात्रेची परंपरा सोलापुरात सुरू आहे़ धार्मिक विधी कार्यक्रम सुरू आहेत.आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो की, या यात्रेच्या धार्मिक विधीचा मान आम्हाला मिळाला़ सिद्धेश्वरांची सेवा परंपरागत आमच्या घराण्याकडून अशीच सुरू राहील़ सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सोलापुरात धार्मिक विधीला सुरुवात झाली आहे़ भक्तिमय वातावरणात अक्षता सोहळा पार पडणार आहे़ -अ‍ॅड़ मिलिंद थोबडे,ज्येष्ठ विधिज्ञ,-----------------सोलापुरात दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा भरते़ संक्रांतीच्या आधी अक्षता सोहळा असतो़ संपूर्ण महाराष्ट्रातून याठिकाणी भक्त येतात़ सिद्धेश्वरांना प्रार्थना करते की, सर्वांच्या आशा, आकांक्षा, इच्छा पूर्ण होऊ दे़ सिद्धेश्वरांप्रति कृतज्ञतेची भावना शिंदे परिवार दरवर्षी व्यक्त करीत असतो़-आ़ प्रणिती शिंदे,शहर मध्य विधानसभा, सोलापूर 

टॅग्स :Solapurसोलापूर