व्यसनमुक्ती दिंडीतून पिंपळवाडीमध्ये जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:24 AM2021-09-11T04:24:14+5:302021-09-11T04:24:14+5:30

कुसळंब : व्यसनमुक्ती दिंडी काढत पिंपळवाडी (ता. बार्शी) मधील लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या दिंडीची सुरुवात पिंपळवाडी प्राथमिक शाळा ...

Public Awareness in Pimpalwadi from De-addiction Dindi | व्यसनमुक्ती दिंडीतून पिंपळवाडीमध्ये जनजागृती

व्यसनमुक्ती दिंडीतून पिंपळवाडीमध्ये जनजागृती

Next

कुसळंब :

व्यसनमुक्ती दिंडी काढत पिंपळवाडी (ता. बार्शी) मधील लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

या दिंडीची सुरुवात पिंपळवाडी प्राथमिक शाळा येथून भीम नगर ग्रामपंचायत कार्यालय मार्गे निघाली. चौधरी गल्ली, देवी चौक मार्गे गावातून रॅली निघाली. यावेळी रॅलीचे उद्घाटन सरपंच जयश्री रमेश चौधरी व गणेश भंडारी यांच्या हस्ते झाले.

विद्यार्थ्यांनी शिवराय, जिजाऊ, सावित्रीबाई फुले, म. जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, झाशीची राणी, भारतमाता इ. महापुरुषांचे वेष परिधान करुन ही जनजागृती केली. या प्रसंगी लायन्स क्लब बार्शीचे अध्यक्ष गणेश भंडारी, साचिव मंगेश बागुल, राहुल दोषी, मनीष रुगले, संतोश दोशी, सचिन माढेकर, सरपंच जयश्री रमेश चौधरी, भोसले सर उपस्थित होते. कार्यक्रमास करण चौधरी, बापूराव ओव्हाळ, दिगंबर चौधरी गोर्धन माने, आजमुद्दीन मुलाणी, ज्ञानदेव चौधरी, श्रीमंत गुरुजी, बप्पा चौधरी, चिऊ पाटील, बबन चौधरी, सुशील चौधरी, अयान मुलाणी, रामा चौधरी, दिनू चौधरी, रंजना चौधरी जयश्री चौधरी, वंदना चौधरी, शैला चौधरी, रुक्साना मुलाणी, संगीता चौधरी, प्रेरणा चौधरी, वंजिता चौधरी, छाया चौधरी उपस्थित होते.

---------

फोटो : १० पिंपळवाडी

पिंपळवाडीतून व्यसनमूक्तीपर जनजागृतीपर दिंडी काढण्यात आली

Web Title: Public Awareness in Pimpalwadi from De-addiction Dindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.