केंद्र सरकारचा मराठा समाजाकडून पंढरपुरात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 19:22 IST2020-09-21T12:04:57+5:302020-09-21T19:22:30+5:30
पंढरपुरात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन;

केंद्र सरकारचा मराठा समाजाकडून पंढरपुरात निषेध
पंढरपूर: केंद्र सरकारने व राज्य सरकारने योग्य भूमिका मांडले नसल्याने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. यामुळे या मनुवादी सरकारचा मराठा समाजाने निषेध व्यक्त केला.
पंढरपुरात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, किरण घाडगे, दिलीप धोत्रे, स्वागत कदम यांच्यासह अन्य मराठा बांधव उपस्थित होते.