स्मशानभूमी अन् दफनभूमीसाठी माळशिरस तहसीलसमोर आंदोलन

By दिपक दुपारगुडे | Updated: October 3, 2023 13:38 IST2023-10-03T13:38:15+5:302023-10-03T13:38:28+5:30

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होऊन देखील अद्यापही पिरळे येथे स्मशानभूमी व मुस्लिम समाज दफनभूमी झालेली नाही

Protest in front of Malshiras Tehsil for cemetery and burial ground | स्मशानभूमी अन् दफनभूमीसाठी माळशिरस तहसीलसमोर आंदोलन

स्मशानभूमी अन् दफनभूमीसाठी माळशिरस तहसीलसमोर आंदोलन

दीपक दुपारगुडे 

सोलापूर : नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टीस संघटना व पिरळे ग्रामस्थांच्या वतीने पिरळे येथे स्मशानभूमी व लिंगायत, मुस्लिम समाज दफनभूमी होण्यासाठी माळशिरस तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होऊन देखील अद्यापही पिरळे येथे स्मशानभूमी व मुस्लिम समाज दफनभूमी झालेली नाही. स्मशानभूमीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी एन डी एम जेराज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे यांनी केली होती. यावेळी विकास धाईंजे, प्रमोद शिंदे, बाळूभाई मुलाणी, सुचित साळवे,अमीर मुलानी ,समीर आता,रसूल मुलाणी अमीर रहीमान मुलाणी,अरमान आतार आदी उपस्थित होते.

Web Title: Protest in front of Malshiras Tehsil for cemetery and burial ground