शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

शाळकरी मुलांच्या अनवाणी पायांना मिळाले संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 10:50 IST

एक पणती सहकार्याची : २७० विद्यार्थ्यांना स्कूल शूज्चे वाटप, लोकमत सखी मंच, बालविकास मंचचा उपक्रम

ठळक मुद्देदिवाळीनिमित्त लोकमत सखी मंच व बालविकास मंचच्या ‘एक पणती सहकार्याची’ या उपक्रमसोलापुरातील २७० शाळकरी मुला - मुलींच्या पायांची ‘लोकमत’ने काळजी घेतली‘एक पणती सहकार्याची’ हा विशेष उपक्रम राबवून या मुलांना स्कूल शूजचे आज वाटप करण्यात आले

सोलापूर : देशाचं भवितव्य असलेल्या; पण बिकट परिस्थितीतून वाट काढत शिक्षण घेणाºया सोलापुरातील २७० शाळकरी मुला - मुलींच्या पायांची ‘लोकमत’ने काळजी घेतली. दिवाळीनिमित्त  ‘एक पणती सहकार्याची’ हा विशेष उपक्रम राबवून या मुलांना स्कूल शूजचे आज वाटप करण्यात आले.

‘लोकमत’ सखी मंच आणि बाल विकास मंचने श्री धूत सिल्क सारीज्, पी. पी. पटेल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, चरण पादुका ट्रेडर्स, अम्मा बिर्याणी यांच्या सहकार्यातून थोबडे वस्ती येथील रितेश विद्यालयात हा अनोखा उपक्रम राबविला.  यावेळी मंचावर श्री धूत सिल्क सारीज्चे पुरुषोत्तम धूत, पी़ पी़ पटेल फाउंडेशनचे जयेश पटेल, चरण पादुका ट्रेडर्सचे हनुमंत बनसोडे, अम्मा बिर्याणीचे नितीन वनेरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका नीता कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती़ मान्यवरांच्या हस्ते लोकमतचे संस्थापक-संपादक स्वातंत्र्य सेनानी स्व़ जवाहरलालबाबूजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर  सखी मंच विभाग प्रतिनिधी श्रद्धा अध्यापक, माधवी उप्पीन, धनश्री, द्राक्षायणी यांनी फराळाचे वाटप केले.

यावेळी मुलांना संबोधित करताना पटेल, बनसोडे म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला पाहिजे़ आपल्याला जर मोठे व्हायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही़ अभ्यास करण्यासाठी नेहमी शिक्षकांची मदत आपण घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.धूत म्हणाले, अभ्यास केल्याशिवाय यश मिळत नाही़ यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी अभ्यास करत रहावे़ यश आपल्यामागे पळत येईल़ जर अभ्यास करताना कोणत्याही शैक्षणिक साहित्याची गरज असेल तर आम्ही सदैव मदतीसाठी तयार राहू असे आश्वासन त्यांनी दिले़ मुख्याध्यापिका निता कांबळे म्हणाल्या, आमच्या विद्यालयामध्ये ८०० विद्यार्थी शिक्षण घेत असून मंथन परीक्षेत राज्यातही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली आहे़ अशा विविध शैक्षणिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असणाºया या मुलांसाठी जो उपक्रम केला आहे त्याबद्दल मी ‘लोकमत’ चे आभार मानते असे मत त्यांनी व्यक्त केले़ तसेच या उपक्रमाबद्दल शाळेच्या संस्थापिका विजयाताई थोबडे यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सहशिक्षिका वर्षा मोरे, मनीषा जाधव, आशा गुमटे, डिंपल जगताप, शाहिदा मुलाणी, पवन कांबळे, समाधान पांढरे हे उपस्थित होते़ यावेळी अनुष्का लोखंडे, चैत्राली पांडव, नेहा पांढरे, प्रणाली कांबळे, जोया शेख, समृद्धी वाघमारे, सिफा शेख, तेजस्विनी आतकरे, खुशी शेख या विद्यार्थ्यांनी स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत केले.

मुलांचे चेहरे खुलले !- दिवाळीनिमित्त लोकमत सखी मंच व बालविकास मंचच्या ‘एक पणती सहकार्याची’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मंगळवारी भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी अचानक मिळालेल्या भेटवस्तूमुळे मुले भारावून गेली़ यामुळे त्यांच्या चेहºयावर दिवाळीच्या सुट्टीपूर्वीचा आनंद ओसंडून वाहत होता़ त्यांचे चेहरे आनंदाने खुलले होते़ यानंतर आणखी भर पडली ती म्हणजे सखी मंचच्या विभाग प्रतिनिधीद्वारे दिलेल्या गोड पदार्थांमुळे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटDiwaliदिवाळी