बांधकाम सुरू करण्यास व्यावसायिक सज्ज; पण परवानगीसाठी प्रशासनात मतैक्य हवे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 02:37 PM2020-05-28T14:37:14+5:302020-05-28T14:39:52+5:30

सोलापूर शहरात २५० कोटींचे प्रकल्प ठप्प; पुणे, मुंबईत हिरवा कंदील; मग सोलापुरात का नाही ?

Professionally ready to start construction; But the administration needs consensus for permission! | बांधकाम सुरू करण्यास व्यावसायिक सज्ज; पण परवानगीसाठी प्रशासनात मतैक्य हवे !

बांधकाम सुरू करण्यास व्यावसायिक सज्ज; पण परवानगीसाठी प्रशासनात मतैक्य हवे !

Next
ठळक मुद्देनोटाबंदी, जीएसटीचा निर्णय आणि रेरा कायदा या तीन बदलांमुळे आधीच बांधकाम क्षेत्राला उतरती कळा आता कोरोनाचे संकट आले असून, त्यामुळे या क्षेत्रासाठी सध्याचा काळ अडचणीचा ठरत आहेगृह, व्यावसायिक तसेच पायाभूत सुविधा अशा सर्वप्रकारच्या बांधकामाच्या साईट्स सध्या बंद आहेत

सोलापूर : मुंबई, पुण्यासारख्या रेडझोनमध्ये बांधकामं सुरू झाली आहेत. सोलापुरात सुरू करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत; बांधकाम सुरू करण्याच्या परवानगीसाठी प्रशासनात लवकरात लवकर मतैक्य झाले पाहिजे, असे मत शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केले असून, बांधकाम मजुरांना लॉकडाऊनच्या  नियमानुसार सर्व सुविधा देण्यास आम्ही तयार आहोत, अशी ग्वाहीही या व्यावसायिकांनी दिली आहे.

लॉकडाऊन ४ मध्ये काही नियम आणि अटी घालून रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बांधकामास परवानगी दिली आहे. सोलापुरात तर २५० कोटी रूपयांचे १२५ गृहनिर्माण प्रकल्प रखडले आहेत. या स्थितीत मुंबई, पुणे, कोल्हापुरात बांधकामास परवानगी दिली असताना सोलापुरात का दिली जात नाही, असा सवाल ‘क्रेडाई’ ने व्यक्त केला आहे.

नोटाबंदी, जीएसटीचा निर्णय आणि रेरा कायदा या तीन बदलांमुळे आधीच बांधकाम क्षेत्राला उतरती कळा लागली होती. आता कोरोनाचे संकट आले असून, त्यामुळे या क्षेत्रासाठी सध्याचा काळ अडचणीचा ठरत आहे. गृह, व्यावसायिक तसेच पायाभूत सुविधा अशा सर्वप्रकारच्या बांधकामाच्या साईट्स सध्या बंद आहेत. अशातच जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका व पोलीस आयुक्त कार्यालय यांच्यात योग्य तो समन्वय नसल्याने बांधकाम परवानगीस वेळ लागत असल्याचेही क्रेडाईच्या पदाधिकाºयांनी सांगितले.

बांधकामं बंद असल्यामुळे त्याच्याशी निगडीत वाळू, विटा, खडी, दगड, मुरूम, डस्ट, सिमेंट कंपन्या, त्यांचे डीलर, किरकोळ विक्रेते, त्याची वाहतूक करणारे हमाल, स्टील इंडस्ट्री, रंग निर्मिती कंपन्या व त्यातील कामगार, विक्रेते, रंगकाम करणारे मजूर, फर्निचर करणारे सुतार, स्टील वर्क करणारे लोहार, टाईल्स, प्लम्बिंग इंडस्ट्री व प्लम्बर, इलेक्ट्रिकल्स साहित्य, इलेक्ट्रिशियन, इंटिरिअर डेकोरेटर्स, काच विक्रेते व त्यावर काम करणारे कारागीरही अडचणीत सापडले आहेत. 

मटेरियलच्या गाड्यांना लागतोय ब्रेक...
- परराज्यासह परजिल्ह्यातून अथवा शहरालगत असलेल्या विविध ठिकाणांहून बांधकामासाठी लागणारे वाळू, विटा, सिमेंट, खडी, दगड, मुरूम, डस्ट व इतर अन्य मटेरियलच्या गाड्या पोलीस अडवत आहेत. त्यामुळे बहुतांश मटेरियल घेऊन येणारा ट्रकचालक शहरात येण्यास घाबरत आहे. त्यामुळे बांधकाम साईटवर मटेरियल वेळेत येत नसल्यानेही बांधकामे सुरू करण्यास अडचणी निर्माण होत असल्याची खंत क्रेडाईचे अध्यक्ष शशिकांत जिड्डीमनी यांनी व्यक्त केली.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बांधकामावर मजुरांच्या आरोग्याच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझर, टेम्परेचर तपासणी याशिवाय आवश्यक त्या उपाययोजना करू. कोल्हापूर, पुण्यात बांधकामे सुरू झाली; आता सोलापुरातील कधी सुरू होतील, याकडे लक्ष लागून राहिले आहे. नियम, अटींच्या अधीन राहून कामे करू. बांधकाम व्यवसाय हा देशातील दुसºया क्रमांकाचा जीडीपी देणारा सेक्टर आहे. तसेच व्यवसायात कामगारांचा मोठा समावेश आहे. त्यामुळे त्वरित बांधकामास परवानगी द्यावी.
- सुनील फुरडे, उपाध्यक्ष, क्रेडाई संघटना, महाराष्ट्र राज्य.

पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. मात्र, अद्याप तरी बांधकाम सुरू करण्यास कुणाकडूनही परवानगी अथवा त्या संदर्भातील आदेश प्राप्त झाला नाही. दरम्यान, परप्रांतीय मजुरांनी सोलापूर सोडल्यामुळे बांधकाम क्षेत्रातील कामे आता संथगतीने चालतील. आम्ही कामगारांना मास्क, सॅनिटायझर, आरोग्य तपासणी करून कामावर घेऊ, आवश्यक त्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेऊ. बांधकामे सुरू करण्यास परवानगी द्यावी.
-शशिकांत जिड्डीमनी,अध्यक्ष, क्रेडाई सोलापूर शाखा.

Web Title: Professionally ready to start construction; But the administration needs consensus for permission!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.