शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

भाव गडगडला अन् कष्टानं पिकवलेला टोमॅटो झाला मातीमोल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 09:18 IST

कोरोनाचा प्रभाव; अर्जुनसोंड शेतकºयाने पीक उपटून जनावरांना घातले

ठळक मुद्देपैसे नसतानाही प्रसंगी पेरणी व लागवड करताना अतोनात कष्ट केलेबाजारात भाव येणार म्हणून शेतकरी आनंदी झाला अन् लॉकडाऊन करण्यात आलेशेतातील टोमॅटो तोडणीसाठी प्रत्येक महिलेस दोनशे पन्नास रुपये मजुरी

विष्णू शिंदे

लांबोटी : शेतात कष्टाने पिकविलेला लालबुंद टोमॅटो बाजारपेठेत जाण्यासाठी तयार झाला अन् लॉकडाऊनमुळे भाव गडगडला. ‘मिळकत कमी, हमाली जास्तीची’ झाल्याने अर्जुनसोंड (ता़ मोहोळ) येथील एका शेतकºयाने टोमॅटो मुळासकट उपसून जनावरांपुढे टाकला.   ही व्यथा आहे अर्जुनसोंड येथील मुकुंद ढेरे या शेतकºयाची़ त्यांनी एक एकर टोमॅटो लावला. त्याची रात्रंदिवस निगा राखत खतपाणी अन् फवारणी करून  जोपासना केली. याच काळात कोरोना विषाणूच्या संकटाने शेतकºयाचे कंबरडे मोडले़ याच काळात एकीकडे जनावरांच्या दुधाला भाव नाही़ तर दुसरीकडे खुराकाचे भाव गगनाला भिडले. भाजीपाला, कलिंगड, टरबूज, टोमॅटो यांना बाजारात किंमत मिळत नसल्याने शेतकरी अधिक चिंतातुर झाला आहे. 

पैसे नसतानाही प्रसंगी पेरणी व लागवड करताना अतोनात कष्ट केले. बाजारात भाव येणार म्हणून शेतकरी आनंदी झाला अन् लॉकडाऊन करण्यात आले़ परिणामत: शेतातील पिकांचे होत्याचे नव्हते झाले. शेतातील टोमॅटो तोडणीसाठी प्रत्येक महिलेस दोनशे पन्नास रुपये मजुरी, वाहतूक खर्च द्यावा लागतोय़ केवळ साठ रुपये पण व्यापाºयांच्या हाती पडत नाहीत़ अशा स्थितीत ढेरे यांनी बाजारात विक्रीसाठी घेऊन गेलेल्या टोमॅटोचे भाव गडगडले़ मागणी नसल्याने सुमारे ४० कॅरेट टोमॅटो तसाच शेतात आणून जनावरांपुढे खायला ओतल्याची व्यथा मुकुंद ढेरे या शेतकºयाने व्यक्त केली.

गावोगावी शेतीत राबराबणाºया शेतकºयांच्या नशिबी हीच तºहा आहे. कधी एकदा हा कोरोना जातो. सर्व पूर्वपदावर येईल, अशी  चर्चा शेतकºयांमधून होत आहे.

शेतात झाला लाल चिखल- काय सांगावं या कोरोनाच्या फटक्यामुळे ९० टक्के  तयार झालेला माल दुसºया दिवशी मुळासकट उपटून जनावरांना चारा म्हणून साखर कारखान्यावरील राजस्थानी गिर गायींना दिला. बाजार समितीत मागणी मंदावली़ व्यापारी टोमॅटो आहे म्हटले की प्रतिसादही मिळत नाही़ कष्टाने पिकवले आणि उत्पन्न हाताला येणार असे वाटत असताना लॉकडाऊनमुळे शेतातच लाल चिखल झाला अशी व्यथा ढेरे यांनी मांडली़ 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेती