शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आधी घेतले ‘पांडुरंगा’चे दर्शन, नंतर पाहिले ‘लोकमत अ‍ॅग्रोत्सवा’तील प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 14:09 IST

पंढरपूर : डोक्याला पागोटा बांधलेला़़़ लुंगी गुंडाळून त्याचा गुडघ्यापासून खोचा खवलेला़़़ कपाळी टिळा, अष्टगंध अन् बुका लावूऩ़़ हातात भगवी ...

ठळक मुद्देकृषी प्रदर्शन पाहण्यासाठी वारकºयांसह स्थानिक शेतकºयांची गर्दीफळबागांच्या लागवडीपासून ते उत्पादनापर्यंतच्या प्रक्रियेची माहिती असणाºया पुस्तकाच्या स्टॉलला भेट लोकमत अ‍ॅग्रोत्सवात कृषीसंदर्भात माहिती मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित

पंढरपूर : डोक्याला पागोटा बांधलेला़़़ लुंगी गुंडाळून त्याचा गुडघ्यापासून खोचा खवलेला़़़ कपाळी टिळा, अष्टगंध अन् बुका लावूऩ़़ हातात भगवी पताका घेऊऩ़़ मुखी हरिनामाचा जयघोष करीत राज्याच्या कानाकोपºयातून आलेल्या भाविकांनी आधी पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि पुन्हा लोकमत अ‍ॅग्रोत्सवातील प्रदर्शन पाहिले.

‘लोकमत’च्या वतीने पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तीर्ण मैदानावर सोलापुरी डाळिंब, ऊस, द्राक्षाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणाºया ‘लोकमत अ‍ॅग्रोत्सवा’चे आयोजन केले आहे़ त्यानिमित्त शहरातील विविध चौकात लावलेले डिजिटल बॅनर लावलेले आहेत़ ते पाहून माघ वारीसाठी पंढरीत आलेल्या हजारो वारकºयांनी गुरुवारी लोकमत अ‍ॅग्रोत्सवात जाऊन विविध स्टॉलवरील माहिती घेतली.

तसेच पांडुरंगाचे दर्शन झाले की बहुतांश वारकरी हे वाखरीतील जनावरांचा बाजार पाहायला जातात़ जाताना वाटेतच पंढरपूर कृृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर जाऊन लोकमत अ‍ॅग्रोत्सवास काही वारकºयांनी भेट दिली़ वारकºयांनी या ठिकाणी द्राक्ष, डाळिंबाचे विविध प्रकार, लांब लचक शेवगा शेंग, भली मोठी पपई, अ‍ॅपल बोर, पेरू, चिक्कू आदीची पाहणी करून त्याच्या लागवडीपासून ते उत्पादनापर्यंतची माहिती घेतली.

काही वारकºयांनी जैन इरिगेशन कंपनीतर्फे सौर ऊर्जेवरील शेतीचा मॉडेल पाहिला़ इतकेच नव्हे तर पाणी देण्याचे स्प्रिंकलर, ठिबक सिंचन याचेही प्रात्यक्षिक पाहिले़ त्यानंतर बी-बियाणे, कृषी अवजारे, खाद्य पदार्थ, विविध आजारावरील आयुर्वेदिक व जडीबुटीच्या औषधाची पाहणी करून काहींनी ते खरेदीही केले.

फळबागांच्या लागवडीपासून ते उत्पादनापर्यंतच्या प्रक्रियेची माहिती असणाºया पुस्तकाच्या स्टॉलला भेट देऊन ती खरेदीही केली़ पशुखाद्याची माहिती जाणून घेतली़ एकूणच काय तर वारकºयांना गुरुवारी पांडुरंगाचे दर्शन तर झाले पण लोकमत अ‍ॅग्रोत्सवात कृषीसंदर्भात माहिती मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे त्यांच्या चेहºयावरील भाव पाहिल्यानंतर लक्षात आले़ 

‘लोकमत अ‍ॅग्रोत्सवा’त माऊली माऊली...- पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर लोकमत अ‍ॅग्रोत्सवाचे कृषी प्रदर्शन सुरू आहे़ पंढरीत दाखल झालेल्या अनेक वारकºयांनी गुरुवारी दुपारनंतर या कृषी प्रदर्शनास भेट दिल्यामुळे अचानक गर्दी झाली़ त्यामुळे या वारकºयांना रांगेतून स्टॉलवरील माहिती घ्यावी लागली़ पुढे कोणते स्टॉल आहे, याची उत्सुकता प्रत्येक वारकºयांना होती़ त्यामुळे रांग पुढे सरकताना नाव न घेता ‘ओ माऊली, ओ माऊली चला पुढं, व्हा पुढं’ असे बोलणे सुरू झाले़ त्यामुळे या ठिकाणी माऊली़़़ माऊलीचा शब्द अनेकांच्या कानी पडला़

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटagricultureशेतीFarmerशेतकरीPandharpurपंढरपूर