शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
3
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
4
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
5
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
6
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
7
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
8
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
9
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
10
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
11
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
12
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
13
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
14
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
15
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
17
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
18
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
19
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
20
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!

तयारी लोकसभेची ; सोलापूर जिल्ह्यात नव्याने ५७ हजार २१६ मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 12:03 IST

प्रारुप मतदार यादी; पुढील दोन महिने सूक्ष्म पुनरिक्षण कार्यक्रम

ठळक मुद्देनव्या यादीत २ लाख ८३ हजार ४०४ मतदारांचा समावेशअक्कलकोट, सोलापूर दक्षिण, मध्य, शहर उत्तरमध्ये मतदार घटलेनिवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विधानसभा मतदारसंघनिहाय प्रारुप मतदार यादी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात ३२ लाख २६ हजार ६८३ मतदारांचा या यादीत समावेश करण्यात आला.  जुलै २०१४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीच्या तुलनेत नव्याने ५७ हजार २१६ मतदार वाढले आहेत. त्यावर दावे, हरकती असल्यास ३१ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा निवडणूक कार्यालय आणि तहसील कार्यालयांमध्ये दाखल करावेत. ज्यांची नाव नोंदणी झालेली नाही त्यांनी नाव नोंदणी करावी, असे  आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. 

निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १० जानेवारी २०१८ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत मोहीम राबविण्यात आली. निवडणूक केंद्रस्तरीय अधिकाºयांच्या माध्यमातून मतदार नोंदणी आणि पडताळणी करण्यात आली. १० जानेवारी रोजी झालेल्या मतदार यादीत ३२ लाख २६ हजार ६८३ मतदारांचा समावेश होता. या यादीची पुन्हा छाननी करण्यात आली. यात पुन्हा १९ हजार ६९ मतदारांची वाढ झाली तर २९ हजार ६४३ नावे विविध कारणांनी वगळण्यात आली. १ लाख ७ हजार ६९ मतदारांबाबत विविध प्रकारच्या दुरुस्त्या करण्यात आल्या. नव्या मतदार यादीत १६ लाख ९५ हजार ७२४ पुरुष मतदारांचा तर १५ लाख ३० हजार ९०९ स्त्री मतदारांचा समावेश आहे. ५० तृतीयपंथी मतदारांचाही समावेश आहे. सर्व राजकीय पक्षांनी शनिवारपासून सुरू होणाºया मतदार यादीच्या पुनरिक्षण कार्यक्रमात मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. 

अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, मध्य, शहर उत्तरमध्ये मतदार घटले- ३१ जुलै २०१४ मध्ये जाहीर झालेल्या मतदार यादीनुसार अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात ३ लाख २८ हजार २०६ मतदार होते तर नव्या यादीत ३ लाख २३ हजार २३ मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात ४ हजार ९७५ मतदारांची घट झाली आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघात २ लाख ९० हजार ४५२ मतदार होते.

नव्या यादीत २ लाख ८३ हजार ४०४ मतदारांचा समावेश असून ७ हजार ४८ मतदारांची घट झाली आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात २ लाख ७३ हजार ५९१ मतदार होते तर नव्या यादीत ही संख्या २ लाख ७२ हजार ७०६ वर पोहोचली आहे. येथेही ८८५ मतदार घटले आहेत. शहर उत्तरमध्ये २ लाख ६९ हजार ९१६ मतदार होते, आता २ लाख ६३ हजार ३५ मतदारांचा समावेश आहे. करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ या मतदारसंघातील मतदार संख्या वाढली आहे.

निवडणूक लवकर झाल्यास हीच यादी - निवडणूक आयोगाने प्रारुप मतदार यादीवर विशेष लक्ष देऊन काम करण्याचे संकेत दिले होते. प्रस्तावित मतदार पुनरिक्षण कार्यक्रमानुसार ४ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. साधारणत: मार्च २०१९ नंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला आहे, परंतु डिसेंबरपूर्वीच आचारसंहिता लागू झाली तर शनिवार, १ सप्टेंबर रोजी जाहीर झालेली प्रारुप मतदार यादी अंतिम मतदार यादी समजली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Solapurसोलापूरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय