सोलापुरात विक्रमाला गवसणी घालण्याचं प्रशांतच स्वप्न भंगलं !

By appasaheb.patil | Published: December 28, 2019 11:56 AM2019-12-28T11:56:21+5:302019-12-28T11:59:54+5:30

मॅरेथॉन स्पर्धांचा विजेता : सरावासाठी धावताना अचानक कोसळल्यानंतर दुर्दैवी एक्झिट

Prashant's dream of putting Vikram in Solapur is a dream! | सोलापुरात विक्रमाला गवसणी घालण्याचं प्रशांतच स्वप्न भंगलं !

सोलापुरात विक्रमाला गवसणी घालण्याचं प्रशांतच स्वप्न भंगलं !

Next
ठळक मुद्देप्रशांत शेंडगे हा सोलापूरचा एक चांगला रनर म्हणून प्रसिद्ध होता२१ किलोमीटरच्या जवळजवळ सतरा-अठरा हाफ मॅरेथॉन चांगल्या विक्रमी वेळेसह पूर्ण केल्यासातारा येथील डॉ़ संदीप लेले यांना ते रनिंगमधील गुरु

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या साक्षीनं नियमित सराव करून अनेक विक्रम पादाक्रांत केले..मेहनत, जिद्द, सराव, सातत्य जपणाºया प्रशातनं अवघ्या एका वर्षात तब्बल सतरा ते अठरा हाफ मॅरेथॉन स्पर्धा विक्रमी वेळेसह जिंकल्या़..हार कधी पाहिलीच नाही़़़पण ती दुर्घटना अनवधानाने घडली...अन् प्रशांत ही स्पर्धा सोडून गेला़  ग्रामदैवताच्या सोलापूर नगरीतच ५ जानेवारी २०२० रोजी विक्रमाशी गवसणी घालण्याचं त्याचं स्वप्न होतं..पण त्याचं हे स्वप्न भंगलं...अशा भावना त्याचे वडील सुधीर शेंडगे यांनी व्यक्त केल्या.

सोलापूरच्या मातीत जन्मलेल्या प्रशांत सुधीर शेंडगेची ओळख म्हणजे मॅरेथॉन स्पर्धेचा विक्रमादित्य अशीच काहींशी झाली होती़़़प्रशांत सोमवार पेठेत एका छोट्याशा कुटुंबातील मुलगा, वडील शिलाई कामगाऱ़़आई घरकाम करणारी़़़छोट्याशा कुटुंबात जन्म घेतलेल्या प्रशांतनं शिकून मोठे होण्याचं स्वप्न बाळगलं होतं... वयाच्या दहाव्या वर्षी मित्रांच्या संगतीनं त्याला मॅरेथॉन स्पर्धेविषयी आकर्षण निर्माण झाले होते़ त्यादृष्टीने प्रयत्न करायला हवे असे विचार मनात येत असताना त्याने सिद्धेश्वर मंदिरालगत असलेल्या तलावाशेजारील रस्त्यांवर धावण्याचा सराव करू लागला़ सराव करताना त्याचे काही मित्र झाले, त्याच मित्रांच्या मदतीने प्रशांतने मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेण्यास सुरुवात केली.

 बालवर्ग ते दहावीपर्यंत शिक्षण प्रशांतनं रॉजर्स इंग्लिश मीडियम स्कूल, होम मैदान, सोलापूर येथून पूर्ण केले़ त्यानंतर अकरावी व बारावीचे शिक्षण कुचन प्रशाला, राजेंद्र चौक, सोलापूर येथे पूर्ण केले़ बारावीत चांगले गुण प्राप्त केल्यानंतर तो इंजिनिअरिंग क्षेत्राकडे वळला़ इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत त्याने ठाणे येथील एका कंपनीत सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर या पदावर काम करण्यास सुरुवात केली़ काम करीत असतानाही त्याचा धावण्याचा सराव सुरूच होता़ काहीतरी करून दाखवायचं या ध्येयाने तो मार्गक्रमण करू लागला़  २०१८ सालच्या एका वर्षात त्याने २१ किलोमीटरच्या जवळपास सतरा ते अठरा हाफ मॅरेथॉन स्पर्धा विक्रमी वेळेसह पूर्ण केल्या तसेच मुंबई येथील फुल मॅरेथॉन ४२ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण केली होती; मात्र ठाणे येथील मॅरेथॉन स्पर्धेत धावण्यासाठीचा सराव करीत असताना तो कोसळला अन् उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली़ प्रशांतच्या निधनाची बातमी ऐकताच सोलापूर, सांगली, सातारा, मुंबईसह सोलापूर रनर्स असोसिएशनच्या पदाधिकाºयांसह सदस्यांना चांगलाच धक्का बसला़ मॅरेथॉन स्पर्धेला प्रोत्साहन देणारा प्रशांत हरपल्याची भावना क्रीडा संघटनांनी व्यक्त केली़ 

गुरूंच्या निधनानंतर शिष्याचीही प्राणज्योत मालवली...
- प्रशांत शेंडगे हा सोलापूरचा एक चांगला रनर म्हणून प्रसिद्ध होता़ २०१८ पासून आजपर्यंत त्यांनी २१ किलोमीटरच्या जवळजवळ सतरा-अठरा हाफ मॅरेथॉन चांगल्या विक्रमी वेळेसह पूर्ण केल्या तसेच मुंबई फुल मॅरेथॉन ४२ किमी देखील पूर्ण केली़ सातारा येथील डॉ़ संदीप लेले यांना ते रनिंगमधील गुरु मानत होते़ डॉक्टर लेले हेदेखील मागील सात महिन्यांपूर्वी सायकलिंग करत असताना अपघातात मयत झाले़ त्यांच्या माघारी प्रशांत रनलाईक केलेले हे स्लोगन वापरून विविध मॅरेथॉनमध्ये सहभागी होत होता, सातारा मॅरेथॉनमध्ये त्याची प्रमुख उपस्थिती असायची़ सातारामधील बरेचशे रनर प्रशांतचे चांगले मित्र होते़ तसेच सोलापूरमधील सोलापूर रनर्स असोसिएशनचा एक चांगला सदस्य होता़ त्याच्या अचानक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मदतीसाठी सोशल मीडियाचा घेतला होता आधार
- प्रशांतची घरची परिस्थिती तशी नाजूक होती़ प्रशांतला मेंदू व इतर आजारपणामुळे शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी सांगितले होते़  त्यासाठी लाखो रुपये लागणार होते़ एवढी मोठी रक्कम कोठून आणायची या प्रश्न त्याच्या कुटुंबीयांसमोर पडला होता़ अशातच मित्रांनी सोशल मीडियावरील फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचा आधार घेत प्रशांतच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला अन् लाखो रुपये जमा झाले; मात्र प्रशांतच राहिला नसल्याने ती रक्कम तशीच राहिली़ दरम्यान, जमा झालेली रक्कम त्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार असल्याचे मित्रांनी सांगितले़ 

५ जानेवारीच्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार होता...
- प्रशांतने आतापर्यंत सर्वच मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदविला होता़ कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणाºया प्रशांतने मॅरेथॉन स्पर्धेला सातत्याने प्रोत्साहन देण्याचे काम केले़ स्वत: सहभागी होतानाच सोबत आपल्या मित्रांनाही मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करीत होता़ अशातच ५ जानेवारी रोजी सोलापुरात होणाºया मॅरेथॉन स्पर्धेतही तो सहभागी होणार होता़ त्यासाठी त्याने पूर्वनियोजित नावनोंदणीही केली होती; मात्र अचानक आलेल्या मृत्युमुळे त्याचे ५ जानेवारी रोजी सोलापुरात होणाºया मॅरेथॉन स्पर्धेत धावण्याचे स्वप्न भंगले़

प्रशांत एक चांगला रनर होताच पण तो एक चांगला माणूसपण होता. रनिंगच्या निमित्ताने जिथे जाईल तिथे त्याने त्याचे मित्र जमविले होते़ त्यांच्या रनिंगच्या पोस्ट, धावण्यातील पेस, सातत्य, शिस्तबद्धता या गोष्टींनी आम्ही भारावून जात होतो़ ५ जानेवारी २०२० ला सोलापूरमध्ये होणाºया मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार होता; मात्र सराव करीत असताना तो पडला काय अन् दोनच दिवसांनी तो आमच्याशी काहीही न बोलता निघून जातो काय़क़ाहीच सुचत नाहीये़
- शेखर दिवसे, प्रशांतचा मित्र, सोलापूर

Web Title: Prashant's dream of putting Vikram in Solapur is a dream!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.