सोलापुरात पठाण चित्रपटाचे पोस्टर फाडले; हिंदू राष्ट्र सेना आक्रमक

By Appasaheb.patil | Updated: January 27, 2023 15:16 IST2023-01-27T15:16:11+5:302023-01-27T15:16:38+5:30

शुक्रवारी सकाळच्या शो च्या सुमारास भगवे ध्वज व बॅनर घेऊन आलेल्या हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते यांनी वंदे मातरम, भारत माता की जय अशा विविध घोषणा देण्यास सुरूवात केली.

Poster of Pathan film torn in Solapur; Hindu Rashtra Sena aggressive | सोलापुरात पठाण चित्रपटाचे पोस्टर फाडले; हिंदू राष्ट्र सेना आक्रमक

सोलापुरात पठाण चित्रपटाचे पोस्टर फाडले; हिंदू राष्ट्र सेना आक्रमक

सोलापूर : शहरातील भागवत थिएटरमध्ये शुक्रवारी सकाळी बाराच्या सुमारास हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पठाण या चित्रपटाचं पोस्टर  काढून चित्रपटाचा निषेध नोंदवित जोरदार घोषणाबाजी केली. 

शुक्रवारी सकाळच्या शो च्या सुमारास भगवे ध्वज व बॅनर घेऊन आलेल्या हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते यांनी वंदे मातरम, भारत माता की जय अशा विविध घोषणा देण्यास सुरूवात केली. याठिकाणी पोलिसही उपस्थित होते. काही वेळानंतर पोलिसांनी सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारी यांना ताब्यात घेतले. पठाण चित्रपट रद्द करावा अशी मागणी हिंदू राष्ट्र सेनेने केली आहे. 

दरम्यान, बुधवारपासून सोलापुरातील सर्वच चित्रपटगृहात शाहरूख खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला काही हिंदू संघटनांनी विरोध दर्शविला होता. परिणामी आंदोलनाचाही इशारा दिला होता. त्यामुळे बुधवारपासून शहरातील चित्रपटगृहासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. बुधवारी अचानक हिंदू राष्ट्र सेनेने आंदोलन केले. या आंदोलनामुळे चित्रपटगृहाबाहेरील परिस्थिती थोडी तणावाची झाली होती. मात्र पोलिसांनी शांतपणे आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून दिले.
 

Web Title: Poster of Pathan film torn in Solapur; Hindu Rashtra Sena aggressive