शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

हत्तीवरुन आलेले आर्द्रा नक्षत्र ४ जुलैपर्यंत कोसळण्याची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:22 IST

बेडूक, मोरही पर्जन्यसूचक  : अन्य नक्षत्रांचा पाऊस बेभरवशाचा

ठळक मुद्देयंदा हत्तीवरुन आरुढ झालेल्या आर्द्रा नक्षत्राचा पाऊस समाधानकारकबेडूक आणि मोर हे वाहन घेऊन आलेले अनुक्रमे आर्द्रा, आश्लेषा आणि उत्तर ही तीन नक्षत्रे पर्जन्यसूचकनक्षत्र शब्दाची व्याप्ती म्हणजे ‘न क्षरति’, म्हणजेच जे क्षय पावत नाही, ते नक्षत्र होय

रेवणसिद्ध जवळेकर

सोलापूर : यंदा हत्तीवरुन आरुढ झालेल्या आर्द्रा नक्षत्राचा पाऊस समाधानकारक बरसला... ४ जुलैपर्यंत तो साºयांनाच आनंद देणारा पाऊस असेल, असे सांगताना पंचांगकर्ते मोहन दाते यांनी हत्ती, बेडूक आणि मोर हे वाहन घेऊन आलेले अनुक्रमे आर्द्रा, आश्लेषा आणि उत्तर ही तीन नक्षत्रे पर्जन्यसूचक असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

नक्षत्र शब्दाची व्याप्ती म्हणजे ‘न क्षरति’, म्हणजेच जे क्षय पावत नाही, ते नक्षत्र होय. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा (फाल्गुनी), उत्तरा (फाल्गुनी), हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती ही २७ नक्षत्रे आहेत. 

यापैकी मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा आणि स्वाती ही पावसाची नक्षत्रे आहेत. ज्या वर्षात ग्रह व नक्षत्रांचा आलेला योग आणि वार्षिक सवंत्सर व त्याच्या गुणधर्मावरुन अन् वाहनांवर पावसाचा अंदाज बांधता येतो. 

यंदा मृग नक्षत्राचा पाऊस समाधानकारक झालाच नाही. उंदीर हे मृग नक्षत्राचे वाहन होते. पटकन येणार अन् पटकन जाणार, कुठे कुरतडल्यासारखे करणे अन् कुठे नाही, असे उंदिराचे असल्याने मृग नक्षत्राचा पाऊस सर्वदूर पडलाच नाही. यंदा पुष्य (वाहन गाढव), मघा (उंदीर), हस्त (गाढव) आणि स्वाती (उंदीर) हे नक्षत्र बेभरवशाचे जाणार असल्याचे भाकित शहरातील बहुतांश ज्योतिषकारांनी केले आहे. 

ज्या-त्या नक्षत्राला मजेशीर नावेही ! - काही नक्षत्रात पडणाºयाया  पावसाला शेतकºयांनी मजेदार नावेही ठेवली आहेत. पुनर्वसू नक्षत्रात पडणाºया पावसाला तरणा पाऊस म्हणतात. पुष्य नक्षत्रात पडणाºया पावसाला म्हातारा पाऊस म्हणतात. आश्लेषा नक्षत्राच्या पावसाला आसलकाचा पाऊस, मघा नक्षत्राच्या पावसाला सासूंचा पाऊस, पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या पावसाला सुनांचा पाऊस, उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या पावसाला रब्बीचा पाऊस आणि हस्त नक्षत्रात पडणाºया पावसाला हत्तीचा पाऊस म्हणतात.

सूर्यासमोर ही नक्षत्रे आली की पर्जन्यमान- सूर्य जेव्हा मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त या नऊ नक्षत्रांसमोर येतो, तेव्हा पाऊस बरसतो. मात्र सर्वच नक्षत्रांमध्ये जोरदार पाऊस पडतोच असे नाही. मेंढा वाहन घेऊन आलेला पुनर्वसूचा पाऊस पिकांसाठी उपयुक्त आणि तृप्त देणारा पाऊस असणार आहे. गाढवावरुन आरुढ झालेल्या पुष्य नक्षत्रात नुसते ढग भरुन येतात. मात्र पावसाची हमी नसते. उत्तरा नक्षत्र यंदा मोर हे वाहन घेऊन आले आहे. शेतकºयांसाठी हा पाऊस खूप काही देणारा असेल, असे ज्योतिषाचार्य प्रा. डॉ. महावीर शास्त्री यांनी सांगितले.

  नक्षत्र               वाहन- मृग                       उंदीर- आर्द्रा                     हत्ती- पुनर्वसू                   मेंढा- पुष्य                      गाढव- आश्लेषा                 बेडूक- मघा                      उंदीर- पूर्वा                      घोडा- उत्तरा                     मोर- हस्त                      गाढव- चित्रा                     बेडूक- स्वाती                    उंदीर

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसAstrologyफलज्योतिष