पोटातला जीव सांभाळत पूजा अन्  यास्मीन कोरोना रुग्णसेवेत अहोरात्र कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 11:55 AM2021-03-08T11:55:11+5:302021-03-08T11:55:16+5:30

राकेश कदम साेलापूर : गराेदरपणाचा काळ हा महिलांसाठी अतिशय कठीण काळ असताे. एकाचवेळी दाेन जीवांची काळजी असते. काेराेनाच्या काळात ...

Pooja Anyasmin Corona working day and night in the patient care | पोटातला जीव सांभाळत पूजा अन्  यास्मीन कोरोना रुग्णसेवेत अहोरात्र कार्यरत

पोटातला जीव सांभाळत पूजा अन्  यास्मीन कोरोना रुग्णसेवेत अहोरात्र कार्यरत

Next

राकेश कदम

साेलापूर : गराेदरपणाचा काळ हा महिलांसाठी अतिशय कठीण काळ असताे. एकाचवेळी दाेन जीवांची काळजी असते. काेराेनाच्या काळात अनेक लाेक डगमगले. मात्र, महापालिकेच्या आराेग्य केंद्रातील परिचारिका यास्मीन पठाण आणि आशा वर्कर पूजा सतारवाले यांनी गराेदर असूनही जीव धाेक्यात घालून काम केले. आजही त्यांच्यासारख्या अनेक सेविका जीव धाेक्यात घालून काम करीत आहेत. 

पूजा राजेश सतारवाले या दाराशा आराेग्य केंद्रात आशा वर्कर आहेत. एप्रिल २०२० मध्ये त्या तीन महिन्यांच्या गराेदर हाेत्या.  एप्रिल महिन्यात साेलापुरात काेराेनाचा पहिला रुग्ण आढळून आला. शहर भीतीच्या सावटाखाली हाेते. तेलंगी पाच्छा पेठ, बेगम पेठ, शास्त्री नगर, कुमठा नाका हे परिसर काेराेनाचे हाॅटस्पाॅट हाेते. या भागात आराेग्य सर्वेक्षणाचे काम सुरू केले. या काळातील अनुभव पूजा सतारेवाले यांनी लाेकमतला सांगितले. पूजा म्हणाल्या, काेराेनाची भीती आमच्या घरातील लाेकांमध्येही हाेती. गराेदर आहेस, कशाला जीव धाेक्यात घालतेस. आपल्याला काय गरज आहे, असे घरचे लाेक सांगायचे. आजूबाजूचे लाेकही मला समजावून सांगायचे, पण या काळात आमचे काम महत्त्वाचे हाेते. म्हणून मी काम करीत राहिले. आम्हाला दिवाळीपर्यंत एक दिवसाची सुटी मिळाली नाही.

आज मला एक महिन्याची मुलगी आहे. मुलीला घरी ठेवून दाेन-दाेन तास मी फिल्डवर जाते. रामवाडी आराेग्य केंद्रात परिचारक म्हणून कार्यरत असलेल्या आज सहा महिन्यांच्या गराेदर आहेत. पूर्वी त्यांना केवळ ओपीडी आणि लसीकरणाचे काम हाेेते. काेराेना आल्यानंतर बाधित रुग्णाच्या संपर्कातील लाेकांना शाेधणे, घराेघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, काेमऑर्बीड व्यक्तींच्या आराेग्य माहिती घेणे हे नवे काम सुरू झाले. सकाळी ११.३० वाजेपर्यंत ओपीडी केल्यानंतर दुपारी उन्हातच त्या रामवाडी, विजापूर नाका झाेपडपट्टी, जुळे साेलापूर या भागात आराेग्य सर्वेक्षणासाठी फिरतात. काेराेनाबाधित रुग्णाच्या घरी जाऊन संपर्कातील चाचण्यांसाठी पाठविणे, क्वारंटाइन करणे हे काम करतात. पूजा सतारवाले आणि यास्मीन पठाण यांच्यासारख्या अनेक आराेग्यसेविकांनी जीव धाेक्यात घालून काम केले आहे. 

डगमगलो नाही!
गराेदरपणाच्या काळात विश्रांतीसाेबत मानसिक आधारही लागताे. यास्मीन पठाण, पूजा सतारवाले यांना एक दिवसाचीही सुटी मिळाली नाही. आराेग्य सर्वेक्षण करताना लाेकांच्या शिव्या ऐकाव्या लागल्या. नगरसेवकांनी धमक्या दिल्या. लाेक अंगावर धावून आले; पण आम्ही डगमगलाे नाही. भीतीपाेटी लाेक आम्हाला बाेलत हाेते, असे या दाेघी आवर्जून सांगतात.

 

 

Web Title: Pooja Anyasmin Corona working day and night in the patient care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.