शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

दुचाकीच्या अपघातात पोलीस उपनिरीक्षक पंकज सातपुते जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 3:06 PM

सोलापूर दि २१ : अंत्रोळीकर नगरात झालेल्या अपघातात तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज भारत सातपुते (वय ३०) यांचा दुचाकीवरून पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे  घडली.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : अंत्रोळीकर नगरात झालेल्या अपघातात तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज भारत सातपुते (वय ३०) यांचा दुचाकीवरून पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे  घडली.रविवारी पहाटे सातपुते हे त्यांच्या दुचाकीवरुन अंत्रोळीकर नगरातील घराकडे जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस रात्रीच्या वेळी अंत्रोळीकर नगरात गस्तीवर असताना त्यांना पंकज सातपुते हे रस्त्यावर पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी बोलावून पंकज सातपुते यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी पंकज यांना मयत घोषित केले. विशेष म्हणजे या अपघातात पंकज यांच्या अंगावर कोणतीही जखम नव्हती. मयत पोलीस उपनिरीक्षक पंकज सातपुते यांचे मूळ गाव मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथे रविवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामीण भागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.------------------------एक वर्षापूर्वी झाले लग्नच् मयत पंकज सातपुते यांचे  एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांची पत्नी जया सातपुते या मुंबईमधील वडाळ पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. जया या प्रसूतीच्या रजेवर सोलापुरात आल्या होत्या. त्यांना वीस दिवसांचा मुलगा आहे. पंकज यांचे वडील भारत सातपुते हे लष्करात होते. त्यातील मोठा मुलगा पंकज होता. त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.