पांजरपोळ चौकातील लॉजवर पोलिसांचा छापा; सहा पीडितांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:22 IST2021-01-30T12:22:00+5:302021-01-30T12:22:05+5:30
बसस्थानकाजवळील कारवाई : चार जणांवर गुन्हा दाखल

पांजरपोळ चौकातील लॉजवर पोलिसांचा छापा; सहा पीडितांची सुटका
सोलापूर : पांजरपोळ चौकात असणाऱ्या विश्वमिलन लॉजवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने धाड टाकत सहा पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी सुरज अवसेकर (रा. जीवनज्योती गृहनिर्माण संस्था, रंगभवन), राहुल मल्हारी सोनकांबळे (मिलिंदनगर, बुधवारपेठ), मल्लिनाथ विभूते (रा. शिंगडगाव), सोपान पांडुरंग लांंबतुरे (रा. थोबडेवस्ती) या आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहे.
एसटी स्टँड परिसरातील विश्वमिलन लॉजमध्ये बेकादेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून या माहितीची खात्री केली. त्यानंतर गुरुवारी दुपारी लॉजवर धाड टाकण्यात आली. यावेळी लॉजवर असणाऱ्या सहा पीडितांची सुटका करण्यात आली. ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर, बंडगर, काळे, इनामदार, मुजावर, मोरे, मंडलिक व भुजबळ यांनी केली.