पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाºयाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 14:54 IST2018-10-20T14:51:46+5:302018-10-20T14:54:12+5:30
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षेसाठी असणाºया एका पोलिसाला मारहाण झाल्याची घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली़ वामन ...

पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाºयाला मारहाण
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षेसाठी असणाºया एका पोलिसाला मारहाण झाल्याची घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली़ वामन यालमार असे मारहाण झालेल्या पोलिसाचे नाव आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून रोज पंढरीत येणाºया भाविकांना अन्नदान केले जाते. अन्नदानाची रांग तुकाराम भवन येथील आजूबाजूच्या परिसरात लावण्यात येते. अन्नछत्राची रांग लावण्यावरून पोलीस हेड कॉन्स्टेबल वामन यलमार व मंगेश मंजुळ यांच्यात वादावादी झाली. यामध्ये मंगेश मंजुळ ने वामन यलमार यांना मारहाण केली आहे. याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात....