पोलीस निरीक्षक सुर्यकांत पाटील, अरूण सावंत, प्रदीप जाधव, हारूण मुलानी यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 19:29 IST2020-12-24T19:27:50+5:302020-12-24T19:29:49+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Police Inspectors Suryakant Patil, Arun Sawant, Pradip Jadhav and Harun Mulani have been transferred | पोलीस निरीक्षक सुर्यकांत पाटील, अरूण सावंत, प्रदीप जाधव, हारूण मुलानी यांची बदली

पोलीस निरीक्षक सुर्यकांत पाटील, अरूण सावंत, प्रदीप जाधव, हारूण मुलानी यांची बदली

सोलापूर -राज्यातील ९६ पोलिस निरीक्षकांना पोलिस उपअधिक्षक/सहायक पोलिस आयुक्‍त पदावर पदोन्नती देण्यात येऊन बदल्या करण्यात आल्याचे आदेश गुरुवारी सायंकाळी गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी काढले. यात सोलापूर शहर व जिल्ह्यातील चार अधिकार्याचा समावेश आहे. 

सोलापूर शहर आयुक्‍तालयातील पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांची पदोन्नतीने सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या उपअधिक्षक (मुख्यालय) पदी बदली करण्यात आली आहे. तसेच सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील पोलिस निरीक्षक अरूण सावंत यांची अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर अधिक्षकपदी, प्रदीप जाधव यांची उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव कॅम्प (नाशिक ग्रामीण) येथे आणि विश्‍वंभर गोल्डे यांची औरंगाबाद शहर सहायक पोलिस आयुक्‍तपदी तसेच केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिस निरीक्षक हारूण मुलाणी यांची पोलिस प्रशिक्षण केंद्र नानवीजच्या उपअधिक्षकपदी पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. 

 

Web Title: Police Inspectors Suryakant Patil, Arun Sawant, Pradip Jadhav and Harun Mulani have been transferred