Police found the disappearance of a missing brothel full of robes! | बेपत्ता वकिलाचा शोध घेताना पोलिसांना सापडलं मृतदेहाच्या तुकडयांनी भरलेलं पोतं !
बेपत्ता वकिलाचा शोध घेताना पोलिसांना सापडलं मृतदेहाच्या तुकडयांनी भरलेलं पोतं !

ठळक मुद्दे- घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल- पोत्यात भरलेले प्रेताचे तुकडे शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात दाखल- प्रेत कुणाचं याबाबत परिसरातील नागरिकांचे तर्कवितर्क

सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या पांडूरंग वस्ती येथे मृतदेहाचे बारीक-बारीक तुकडे केलेलं पोते बुधवारी आढळून आले. गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या एका वक़िलाचा शोध घेताना पोलिसांच्या हाती हे पोते सापडले.

ही घटना बुधवारी सकाळी साडे बाराच्या सुमारास उघडकीस आली़. याबाबत पोलिसांनी प्राथमिक दिलेली माहिती अशी की, पांडूरंग वस्ती येथे एका व्यक्तीचे गेल्या पाच दिवसांपासून घर बंद होते़. घरातून दुर्गंधी येत असतानाही आजुबाजुच्या लोकांनी याबाबत कुठलेही तक्रार पोलिसांकडे केली नाही़. दरम्यान, मंगळवारी अ‍ॅड़. राजेश कांबळे हे गायब असल्याची तक्रार सोलापूर बार असोसिएशनच्यावतीने सोलापूर आयुक्तालयात देण्यात आली़.

 या तक्रारीवरून पोलीसांनी बुधवारी सकाळी बाराच्या सुमारास पांडूरंग वस्ती येथील बंटी खरटमल याच्या घरी भेट दिली़. यावेळी सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी घराची संपूर्ण पाहणी केली असता घरात प्रेताचे तुकडे भरून ठेवलेले पोते आढळून आले़. पोलीसांनी पोत्यात ठेवलेले प्रेत ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात पाठविले आहे़.


 


Web Title: Police found the disappearance of a missing brothel full of robes!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.