अन् झेडपीत आले पोलीस; काल झाली होती वरिष्ठ अधिकाºयांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 18:08 IST2020-07-15T18:08:42+5:302020-07-15T18:08:46+5:30

का आणि कशासाठी आले पोलीस वाचा सविस्तर

Police in Anzpit; An inquiry was held by senior officials yesterday | अन् झेडपीत आले पोलीस; काल झाली होती वरिष्ठ अधिकाºयांची चौकशी

अन् झेडपीत आले पोलीस; काल झाली होती वरिष्ठ अधिकाºयांची चौकशी

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमधील एका महिला कर्मचाºयाने केलेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी बुधवारी सायंकाळी सोलापूर शहर पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकाºयांनी झेडपीत प्रवेश केला होता़ त्यामुळे इतर कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली होती.

सोलापूर जिल्हा परिषदेतील एका महिला कर्मचाºयाने कार्यालयीन कामकाजात त्रासाबद्दल पोलिस आयुक्तालयात तक्रार केली आहे, या तक्रारीच्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलिस अधिकाºयांनी मंगळवारी झेडपी तील तीन वरिष्ठ अधिकाºयांना पोलिस आयुक्तालयात बोलावून चौकशी केली़ त्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली.

 याबाबत पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता कटकधोंड यांना विचारले असता गैरसमजातून तक्रार करण्यात आली होती, प्रकरण सामोचाराने मिटले आहे, असे सांगितले. पण सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलिसांचे एक पथक झेडपीत दाखल झाले आहे. या पथकाने संबंधित विभागातील कर्मचाºयांचे जाबजबाब घेण्यास सुरुवात केल्याने जिल्हा परिषदेत हा विषय चर्र्चेचा ठरला आहे. तक्रार कोणी व कोणत्या कारणासाठी केली असे कर्मचारी एकमेकांमध्ये चौकशी करताना दिसून आले.

Web Title: Police in Anzpit; An inquiry was held by senior officials yesterday