शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी पाईपलाईन योजना पूर्ण झाल्यावर सोलापूरकरांना २४ तास पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 12:46 IST

सोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेचारशे कोटी रुपये दिले. या योजनेमुळे शहरवासीयांना २४ तास पाणी मिळणार असून माता-भगिनींना पाण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही.

ठळक मुद्दे सोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेचारशे कोटी रुपये दिले. योजनेमुळे शहरवासीयांना २४ तास पाणी मिळणार असून माता-भगिनींना पाण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही. एक हजार कोटींच्या योजना सोलापूरला मोदी यांनी दिलेल्या आहेत.

सोलापूरसोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेचारशे कोटी रुपये दिले. या योजनेमुळे शहरवासीयांना २४ तास पाणी मिळणार असून माता-भगिनींना पाण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही. एक हजार कोटींच्या योजना सोलापूरला मोदी यांनी दिलेल्या आहेत. यामुळे संपूर्ण शहराचा कायापालट होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात झालेल्या सभेत बुधवारी सांगितले.

फडणवीस यांनी भाषणाची सुरुवात सिद्धरामेश्वराची नगरी आणि पांडुरंगच्या आशीर्वाने केली. ते म्हणाले, ही खरोखरच कर्मयोग्याची भूमी असून गरीब आणि कष्टी कामगार येथे उपस्थित आहेत, ते खरोखरच कर्मयोगी आहेत. कष्टकऱ्यांसाठी सोलापुरात ३० हजार घरे उभी करण्यात येत आहेत, या घरांसाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे अभिवचन त्यांनी आडम मास्तर यांना दिले. तांत्रिक त्रुटी, बँक गॅरंटी या सगळ्यातून मार्ग काढृन हा प्रकल्प पूर्ण करू, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

फडणवीस म्हणाले, २०१४ साली मोदींनी जे आश्वासने दिली ती सर्व पूर्ण केली आहेत. शहर आणि गावाचा समतोल विकास झाला पाहिजे,  तरच देशाचा समतोल विकास होईल यासाठी सोलापूरला एक हजार कोटी दिले आहेत.यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही पंतप्रधानांनी केंद्राची मदत मिळण्यासाठी मागणी केली होती, त्यांनी पथक पाठवून पाहणी केली आणि आता ही मदत लवकरच मिळेल, असेही फडणवीस म्हणाले. जिल्ह्याभोवती गुळगुळीत रस्त्याचे जाळे निर्माण केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले.  येथे सांडपाण्याचा मोठा प्रकल्प उभा राहात असून येथील अतिरिक्त पाणी एनटीपीसीला विकण्यात येणार आसून त्यातून आलेल्या पैशांमधून शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी मदत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीSolapurसोलापूरBJPभाजपा