प्लॅटफॅार्म तिकीट आता ५० रूपये; सोलापूर, अहमदनगर अन् कलबुगी स्थानकावर अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 12:15 IST2021-04-28T12:15:19+5:302021-04-28T12:15:25+5:30
रेल्वे प्लॅटफॅार्म तिकीट आता ५० रुपये

प्लॅटफॅार्म तिकीट आता ५० रूपये; सोलापूर, अहमदनगर अन् कलबुगी स्थानकावर अंमलबजावणी
सोलापूर : स्थानकावरील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॅार्म तिकीट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर, कलबुर्गी अन् अहमदनगर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॅार्म तिकीट आता ५० रुपये करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मध्य रेल्वेमधील सोलापूर विभागातील काही महत्त्वपूर्ण स्थानकावर तिकीट दर वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पूर्वी प्लॅटफॉर्मचे तिकीट १० रुपये होते आता ते ५० रुपये करण्यात आले आहे. ही दरवाढ २७ एप्रिलपासून २५ मे २०२१ पर्यंत असणार आहे.
सोलापुरातील रेल्वे प्रवाशांची संख्या घटली; रोज होतात दीडशे तिकीटं रद्द https://www.lokmat.com/solapur/number-railway-passengers-solapur-decreased-one-and-half-hundred-tickets-are-canceled-every-day-a311/