आईच्या अस्थींवर वृक्षारोपण, सोलापुरातील शेतकरी पुत्र; पर्यावरण रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 04:50 IST2017-10-19T04:50:06+5:302017-10-19T04:50:32+5:30

वडवळ (ता. मोहोळ) येथील एका शेतकरी पुत्राने दिवंगत आईच्या अस्थींचे विसर्जन पाण्यात न करता आपल्या शेतात त्या पुरल्या आणि त्यावर वृक्षारोपण करून आईची स्मृती अखंड ठेवली. तसेच पर्यावरण रक्षणाचाही संदेश दिला.

 Plantation on mother's bone, son of farmer from Solapur; Environmental protection | आईच्या अस्थींवर वृक्षारोपण, सोलापुरातील शेतकरी पुत्र; पर्यावरण रक्षण

आईच्या अस्थींवर वृक्षारोपण, सोलापुरातील शेतकरी पुत्र; पर्यावरण रक्षण

सोलापूर : वडवळ (ता. मोहोळ) येथील एका शेतकरी पुत्राने दिवंगत आईच्या अस्थींचे विसर्जन पाण्यात न करता आपल्या शेतात त्या पुरल्या आणि त्यावर वृक्षारोपण करून आईची स्मृती अखंड ठेवली. तसेच पर्यावरण रक्षणाचाही संदेश दिला.
हणमंत श्रीरंग मोरे असे या शेतक-याचे नाव असून, त्यांची आई शकुंतला (८९) यांचे रविवारी निधन झाले़ मंगळवार हा तिसरा दिवस होता. अस्थीचे विसर्जन लांबोटी येथील सीना किंवा पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत करण्याची आजवरची प्रथा होती; मात्र त्याला फाटा देत हणमंत यांनी शेतात दोन खड्डे पाडून तेथे अस्थी पुरल्या. तसेच त्यावर वृक्षारोपण केले. या वृक्षांची काळजी घेऊन आईच्या स्मृती कायम जतन करणार असल्याचे हणमंत मोरे यांनी सांगितले.

ज्या आईने हे जग दाखवले तिच्या मृत्यूपश्चात तिच्या अस्थी तरी माझ्यापासून इतक्या लांब का विसर्जित कराव्यात, माझ्या शेतातच झाडांच्या रुपाने आईचे अस्तित्व मला जाणवणार आहे. या झाडांची मी आईप्रमाणेच काळजी घेणार आहे.
- हणमंत मोरे,
शेतकरी, वडवऴ

Web Title:  Plantation on mother's bone, son of farmer from Solapur; Environmental protection

टॅग्स :Farmerशेतकरी