शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
3
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
4
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
5
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
6
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
7
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
8
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
9
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
10
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
11
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
12
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
13
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
14
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
15
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
16
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
17
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
18
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?
19
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
20
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...

भेदरलेल्या बोकडानं केलं ‘बेंऽऽ बेंऽऽ’; चोरट्यांच्या टोळीची उडाली ‘फेंऽऽ फेंऽऽ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 20:09 IST

बोकड चोरीप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्दे- डोणगांव येथील वस्तीवर घडली चोरीची घटना- याप्रकरणात दोन महिलांसह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल- चोरीच्या घटनांनी परिसरात दहशत

- संताजी शिंदे

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील वस्तीसमोर बांधलेल्या पंधरा हजार रुपये किमतीच्या बोकडाला चोरून नेत असताना त्याचा बें ऽऽ बें ऽऽ असा आवाज ऐकून मालक पळत आला तेव्हा चोरांनी रिक्षा जागेवर सोडून तेथून पळ काढला. या प्रकरणी दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

रिक्षाचालक-नितीन सुभाष राठोड, चंद्रकांत भीमा गायकवाड, रत्नाबाई तुळशीदास गायकवाड, शारदाबाई विजय जाधव, राजू भीमू जाधव (सर्व रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दि.१८ फेब्रुवारी रोजी दुपारी उषा रामराव राठोड (वय ३६, रा. भोजप्पा तांडा, कवठे, ता. उत्तर सोलापूर) या डोणगाव येथील शेतात काम करीत होत्या. शेताच्या जवळ असलेल्या वस्तीवर त्यांनी बोकड बांधले होते. एक रिक्षा वस्तीजवळ येऊन थांबली. वस्तीवर पाण्याचा हौद असल्याने कदाचित पाणी पिण्यासाठी थांबले असावेत असा समज उषा राठोड यांचा झाला. 

उषा राठोड या खाली मान घालून काम करीत असताना, अचानक बोकड ओरडण्याचा आवाज आला. उषा राठोड यांनी मान वर करून पाहिले असता, वस्तीवर बांधलेले बोकड चोरटे रिक्षात घालून घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. आरडाओरड करीत त्या वस्तीच्या दिशेने धावत सुटल्या. तेव्हा आजूबाजूचे लोकही वस्तीच्या दिशेने धावले. त्यांनी जाणाºया रिक्षाला अडवले. तेव्हा शारदाबाई जाधव व राजू जाधव हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. लोकांनी रिक्षाचालक नितीन राठोड, चंद्रकांत गायकवाड व रत्नाबाई गायकवाड या तिघांना पकडले. तिघांना पकडल्यानंतर सलगरवस्ती पोलीस ठाण्याला फोन करून माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व तिघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी उषा राठोड यांनी फिर्याद दिली आहे. तपास पोलीस हवालदार माळी करीत आहेत. 

मंद्रुप, कामती (बु.) येथे यापूर्वी गुन्हे दाखल - रिक्षा चालकाव्यतिरिक्त इतरांवर यापूर्वी शेतातील बोकड चोरून नेल्याप्रकरणी मंद्रुप पोलीस ठाणे व कामती (बु.) पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तिघांना बुधवारी न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायाधीशांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत पवार यांनी दिली. 

रोज एक-दोन बोकडांची चोरी...- ओळखीच्या व्यक्तीची रिक्षा करायची, त्यात बसून दक्षिण सोलापूर, मोहोळ, उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागात फिरायचे. एखाद्या ठिकाणी सावज शोधायचा आणि चरणाºया बोकडाला पकडून रिक्षात घालायचे. बोकडाचे तोंड दाबून ते चोरून न्यायचे असा प्रकार नित्यनियमाने केला जातो. चोरून आणलेले बोकड ठरलेल्या मांस विक्री करणाºया व्यक्तीला विकून त्यात आलेले पैसे वाटून घेतले जातात. कधी एक, कधी दोन तर कधी तीन बोकड चोरून त्याची विक्री केली जात असल्याची चर्चा स्थानिक लोकांमध्ये केली जात होती. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीThiefचोर