बीआरएसमध्ये गेलेले लोक मतदानावेळी भाजपमध्ये येतील, सुभाष देशमुखांचा दावा
By राकेश कदम | Updated: August 8, 2023 18:05 IST2023-08-08T18:04:59+5:302023-08-08T18:05:07+5:30
दक्षिण साेलापूर तालुक्यातील 50 हून अधिक सरपंच आणि उपसरपंच यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्याचा दावा पक्षाचे साेलापूर समन्वयक नागेश वल्याळ आणि सचिन साेनटक्के यांनी केला आहे.

बीआरएसमध्ये गेलेले लोक मतदानावेळी भाजपमध्ये येतील, सुभाष देशमुखांचा दावा
तेलंगणाच्या भारत राष्ट्र समिती पक्षात गेलेले दक्षिण साेलापूर तालुक्यातील कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीत मतदानावेळी भाजपसाेबत येतील, असा दावा भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी मंगळवारी केला.
दक्षिण साेलापूर तालुक्यातील 50 हून अधिक सरपंच आणि उपसरपंच यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्याचा दावा पक्षाचे साेलापूर समन्वयक नागेश वल्याळ आणि सचिन साेनटक्के यांनी केला आहे. हैदराबादमध्ये साेमवारी पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला. प्रवेश करणारे लाेक भाजपचे आहेत, असेही वल्याळ यांनी सांगितले. यावर भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी टीका केली. हैदरबादला गेलेले काही लाेक हाैसे, गवसे, नवसे हाेते. हे हाेतच असते. ही मंडळी मतदानावेळी भाजपमध्ये येतील, असेही देशमुख म्हणाले.