शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

भाजपा सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारा पक्ष - आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 01:23 IST

लहान पक्ष महत्त्वाचे; सोबत घेतल्यास काँग्रेसची सत्ता

पंढरपूर : भारतात दोन समाजात तेढ निर्माण करून दंगली घडवल्या जातील, युद्ध लादून सैनिकांना शहीद करण्याचे कामदेखील होईल. यातून आम्ही शांतता राखण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र भाजपा निर्माण करेल. कारण भाजपा सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारा पक्ष असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला.धनगर आरक्षणासंदर्भात आयोजन झालेल्या मेळाव्यासाठी आंबेडकर पंढरपूर येथे आले होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुकाबला फक्तमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हेच करू शकतात. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आणखी राजकीय शिक्षणाची गरज आहे. काँगे्रसला पुन्हा सत्तेत यायचे असेल, तर लहान पक्षांना सोबत घ्यावे लागेल. मात्र, त्यांनी कर्नाटकाच्या निवडणुकीत त्याचा बोध घेतल्याचे दिसून येत नाही. काँग्रेस पक्ष बदलत नसेल, तर तिसरा पर्याय निर्माण होईल. कर्नाटक येथील काँग्रेस व जेडीएस यांचे सरकार स्थिर राहणार नाही. पुढील तीन महिन्यांमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळणार आहे.घटनेत तरतूद असलेल्या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, मुस्लीम, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण देण्यास आमचा कोणताही विरोध नसून, त्यांना आरक्षण मिळावे. यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे ते म्हणाले. सत्तांतरानंतर १२ बलुतेदारांचे प्रश्न सोडवित असताना, बहुजन समजाला सोबत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.संविधान बदलण्याची शेवटची संधीभाजपाला संविधान बदलायचे आहे, त्यामुळे ते सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचे कर्नाटकाच्या निवडणुकीनंतर दिसले आहे. २०१९च्या निवडणुका हा भाजपासाठी संविधान बदलण्याची शेवटची संधी आहे. त्यामुळे २०१९पूर्वी अनेक प्रकार दिसून येतील, असे आंबेडकर यांनी सांगितले. मात्र, त्यांचे मनसुबे पूर्ण न होऊ देण्यासाठी समविचारी पक्षांनी देश पातळीवर एकत्र येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर