शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 5:18 PM

माढा तालुक्यात पहिल्यांदाच कमळ फुलले : भाजपची आॅफर नाकारत संजयमामांनी संधी घालवली !

ठळक मुद्देमाढा तालुक्यातील शिंदे बंधूंच्या एकहाती सत्तेलाही धक्का बसलाशरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतल्यापासूनच या मतदारसंघात राष्ट्रवादीबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले होते

डी. एस. गायकवाड

टेंभुर्णी  : शरद पवार यांच्यामुळे संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर विजयी झाल्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला असून, माढा तालुक्यातील शिंदे बंधूंच्या एकहाती सत्तेलाही धक्का बसला आहे.

शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतल्यापासूनच या मतदारसंघात राष्ट्रवादीबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. शरद पवार नाहीत तर मग कोण? याबाबत लोक चर्चा करीत  होते. विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्याची पक्षाची तयारी होती,  परंतु विजयदादा पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीबाबत आग्रही होते. 

रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावास मतदारसंघातील मातब्बरांचा विरोध होता. यामुळे उमेदवारी कोणास द्यावी, याबाबत पक्षात संभ्रम होता. यात बराच वेळ गेला. दरम्यानच्या काळात रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळत नाही हे लक्षात येताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मागील चार-साडेचार वर्षांपासून राष्ट्रवादीशी फारकत घेऊन भाजपशी घरोबा केलेल्या संजयमामा शिंदे यांनाच राष्ट्रवादीची  उमेदवारी देण्यात आली. मागील दहा वर्षांपासून संजयमामा शिंदे व मोहिते-पाटील यांच्यात एकाच पक्षात असूनही टोकाचे मतभेद होते.

संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर होताच मोहिते-पाटील अधिकच  सक्रिय झाले. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे  माढा तालुक्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. माढा तालुक्यातील शिंदे बंधूंचे सर्व विरोधक प्रथमच एकत्र आले. यातील काही मोहिते-पाटलांच्या नेतृत्वाखाली तर काहींनी थेट मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी संजय शिंदे यांना घेरण्याची रणनीती आखली. मागील चार वर्षांपासून भाजपने संजय शिंदे यांना राजकीय ताकद दिली. झेडपी अध्यक्ष केले.

लोकसभेची उमेदवारीही देऊ केली, परंतु आयत्या वेळी संजय शिंदे यांनी भाजपचा घरोबा सोडून पुन्हा राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले व पक्षाची उमेदवारीही स्वीकारली. मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना धक्काच बसला. चंद्रकांतदादा पाटील यांनी तर संजय शिंदे यांना गद्दार म्हटले. यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून संजय शिंदे यांना धडा शिकवण्यासाठी व्यूहरचना केली गेली. 

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाढाBabanrao Shindeबबनराव शिंदेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल