शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
4
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
5
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
6
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
7
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
8
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
9
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
10
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
11
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
12
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
13
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
14
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
15
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
16
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
17
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
18
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
19
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
20
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य

मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:22 IST

कोणतेही मूल ते लहान असो किंवा तरुण हे त्या कुटुंबाचे, समाजाचे, देशाचे प्रसंगी जगाचे भविष्य असते.

ठळक मुद्देआई-वडील दिवसभर नोकरी, व्यवसायानिमित्त व्यस्त असले तरी दिवसातून काही वेळ तरी मुलांसाठी ते नक्की देऊ शकतात. कोणतीही गोष्ट तो आई-वडिलांपाशी बोलेल एवढा मोकळेपणा या नात्यात असणे गरजेचे आहे

लहान मूल म्हणजे एक कोरी करकरीत पाटी. त्या पाटीवर जसे गिरवाल तसे त्याचे व्यक्तिमत्त्व घडत जाते, त्याचे आयुष्य बनत जाते. पण या पाटीवर गिरविण्याची मुख्य भूमिका कोणाची?, तर ती त्याच्या पालकाची म्हणजेच आई-वडिलांची, त्यानंतर मग त्याचे शिक्षक, मित्रमंडळी व समाजाची. यातील नंतरचे घटक निवडण्यामध्ये व त्यावर लक्ष ठेवण्यामध्ये पालक आपली भूमिका चांगल्या रितीने वठवू शकतात. पण पालकाची भूमिका चुकली तर सारेच चित्र बिघडू शकते. लहान मूल विशेषत: आईच्या अगदी जवळ असते़ त्यास योग्य ते संस्कार करणे, चांगले वळण लावणे, शिस्त लावणे हे आईशिवाय चांगल्या रीतीने कोण करू शकेल? मूल शाळेत जायला लागल्यानंतर मात्र ही जबाबदारी आई-वडील दोघांची बनते. 

ज्या घरात आजी- आजोबा आहेत त्या घरात मुलांच्या जडणघडणीत त्यांचादेखील वाटा असतो. आजच्या काळात आई-वडील दोघांनाही नोकरी, व्यवसाय करणे क्रमप्राप्त असले तरी एकत्र कुटुंब टिकवणे, मुलांना त्यांच्या आजी-आजोबांच्या छायेत ठेवणे हे तरी पालक निश्चितपणे करू शकतात. 

आई-वडील दिवसभर नोकरी, व्यवसायानिमित्त व्यस्त असले तरी दिवसातून काही वेळ तरी मुलांसाठी ते नक्की देऊ शकतात. त्याच्याशी संवाद साधू शकतात. त्याच्या शाळा, कॉलेजमध्ये सध्या काय चालू आहे? त्याची मित्रमंडळी कोण आहेत? मोबाईल, इंटरनेटवर तो नक्की काय पाहतोय ? त्याच्या वर्तणुकीतील वेळोवेळी होणारे बदल याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणे हे क्रमप्राप्त आहे. कोणतीही गोष्ट तो आई-वडिलांपाशी बोलेल एवढा मोकळेपणा या नात्यात असणे गरजेचे आहे. मुलाला त्याच्या आई-वडिलांशिवाय कोणीही इतर व्यक्ती चांगल्या रीतीने समजू शकत नाही. त्यासाठी पालकांनी आपली भूमिका चोख बजावणे गरजेचे आहे.

आपल्या पाल्यासाठी योग्य शाळा, कॉलेज निवडणे, चांगल्या मित्राचे महत्त्व त्याला सांगणे, समाजातील चांगल्या घटनांचे त्यास साक्षीदार बनविणे व वाईट प्रवृत्ती, घटनांपासून त्यास दूर ठेवणे यात पालक म्हणून आपण कशी भूमिका निभावतो यावर या इतर घटकांचा चांगला, वाईट परिणाम त्याच्या व्यक्तिमत्त्वावर पडत असतो. त्यामुळे या घटकांचीदेखील खरी दोर ही पालकांच्याच हातात असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .

चांगली शाळा, कॉलेज, मित्रमंडळी, समाजातील घटक नक्कीच त्याचे व्यक्तिमत्त्व फुलविण्यास मदत करतात. पालक आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस झटत असतात. त्याच्या भविष्याची गुंतवणूक करीत असतात. या धावपळीत, व्यस्ततेत जी मुख्य गुंतवणूक म्हणजे त्यांची मुले, यांच्याकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ शकते. पालक आपली व्यस्ततेची सबब पुढे करतात. पण जी तुमची अनमोल गुंतवणूक आहे ती मुले व्यसनी, परावलंबी, शिक्षणात पीछेहाट झालेली, गुन्हेगार प्रवृत्तीची झालेली आपल्याला परवडणार आहे का?मुलांना प्रोत्साहन देणे, अपयशामध्ये खंबीरपणे त्याच्या पाठीशी राहणे, खेळ, साहित्य, कला यामध्ये त्याचा रस निर्माण करणे. विविध स्पर्धेमध्ये त्याचा सहभाग करून घेणे, आपल्या संस्कृतीची, परंपरेची त्यास नीटशी ओळख करू देणे या सर्व कामी पालक म्हणून आपण सक्रिय असणे गरजेचे आहे. एखाद्या वेळेस मुले चुकली तर त्यास योग्य त्या वाटेवर आणणे, त्याच त्याच चुकांपासून त्यास परावृत्त करणे, आपल्या जीवनातील चांगल्या-वाईट अनुभवांचे सार त्यास देणे हे पालकाशिवाय दुसरे चांगल्या रितीने कोण करू शकेल? 

कोणतेही मूल ते लहान असो किंवा तरुण हे त्या कुटुंबाचे, समाजाचे, देशाचे प्रसंगी जगाचे भविष्य असते. त्याचे योग्य ते पालनपोषण करणे, भविष्याची निगा राखणे, त्याचे एका चांगल्या व्यक्तीत रूपांतर करणे यात पालकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. इतिहासातील महापुरूषांच्या जीवनावरून या गोष्टीला बळकटी प्राप्त होते. आपल्या व्यस्ततेला, धावपळीला, भविष्यातील गुंतवणुकीला, करीअरला थोडासा लगाम घालून पालकांनी आपली भूमिका काटेकोरपणे बजावली तर मुलांचे भविष्य नक्कीच उज्वल बनेल, यात कोणतीही शंका नाही.  - महेश भा. रायखेलकर(लेखक संगणक प्रशिक्षक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरStudentविद्यार्थीSchoolशाळाEducationशिक्षण