शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पोलिसांमधील जणू ‘पांडुरंग’ धावला; हरविलेला बालक माऊलीच्या कुशीत विसावला !

By appasaheb.patil | Updated: November 10, 2020 14:12 IST

गर्दीने झाली होती ताटातूट : लेकराला पाहताच मातेचे दुखावलेले नेत्र सुखावले!

ठळक मुद्देदिवाळीनिमित्त साहित्य, कपडे खरेदीच्या नादात मायमाऊलीपासून दीड-दोन वर्षीय मुलगा दुरावलाआईच दिसेनासे झाल्याने मुलगा रडतच एका दुकानासमोर उभा होतापोलिसांमधील जणू या ‘पांडुरंग’नेच त्या मायमाऊलीचा शोध लावत त्या मुलाला तिच्याकडे सोपवले

सुजल पाटील

सोलापूर : दिवाळीनिमित्त साहित्य, कपडे खरेदीच्या नादात मायमाऊलीपासून दीड-दोन वर्षीय मुलगा दुरावला. आईच दिसेनासे झाल्याने मुलगा रडतच एका दुकानासमोर उभा होता. मायलेकाची एकमेकांपासून ताटातूट झाली होती. एका युवकाने प्रेमाने जवळ घेत त्याला वाहतूक पोलीस पांडुरंग बिराजदार यांच्या स्वाधीन केले. पोलिसांमधील जणू या ‘पांडुरंग’नेच त्या मायमाऊलीचा शोध लावत त्या मुलाला तिच्याकडे सोपवले. आई सोना सागर धोत्रे आणि तिच्यापासून दूर गेलेला हर्षद यांची अखेर गळाभेटही झाली.

नवीपेठेतील हा प्रसंग. सायंकाळचे सात वाजलेले. दिवाळी खरेदीसाठी आईबरोबर आलेला मुलगा तिच्यापासून दुरावला. गर्दीत मुलाची वाट चुकली, आईची साथ सुटली अन्‌ हातही सुटला. तेथे थांबलेल्या सुनील उमदे याने त्याला प्रेमाने जवळ घेत कहाणी ऐकून घेतली. सुनीलने त्याला वाहतूक पोलीस पांडुरंग बिराजदारकडे स्वाधीन केले. पांडुरंग यांनी अख्खी नवीपेठ पालथी घालूनही त्याची आई काही मिळत नव्हती. दरम्यान, पांडुरंग यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना कळवले. नेमक्या सदर बझार पोलीस ठाण्यात त्याची आई आली. तिने मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवली. तितक्यात वाहतूक पोलीस बिराजदार हे त्या मुलास घेऊन तेथे दाखल झाले. समोर आपला मुलगा दिसताच त्या मायमाऊलीचे पाणावलेले नेत्र सुखावून गेले. दरम्यान, खरेदी करताना महिलांनी शक्यतो मुलांना आणू नयेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दीत जाणे टाळावे. दिवाळीत होणाऱ्या गर्दीचा विचार करूनच नागरिकांनी बाहेर पडावे, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

पांडुरंगांनी दुकानं पालथी घातली !

आईपासून ताटातूट झालेल्या या मुलाची भेट घडवून आणण्यासाठी वाहतूक पोलीस पांडुरंग यांनी नवीपेठेतील प्रत्येक दुकान पालथे घातले. कुठे याची माता सापडते का? हाच विचार मनी बाळगून पांडुरंगाची पावलं झेपावत होती. ‘इथं तुझी आहे का?’ अशी सतत विचारणा पांडुरंग यांनी त्या मुलाकडे करीत होता. काही दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेजही पांडुरंग बिराजदार तपासताना दिसत होते.

 

गर्दीत हरवलेल्या मुलाला सुनील उमदे या युवकाने माझ्या स्वाधीन केले. त्यानंतर मी व सुनीलने संपूर्ण बाजारपेठेत त्या मुलाच्या आईचा शोध घेतला. मात्र त्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे मी संबंधित कंट्रोलला कळवून माहिती दिली. काही वेळातच पोलीस दाखल झाले अन् त्या मुलाची आईही दाखल झाली. मायलेकरांची भेट घडवून आणली यातच मला समाधान आहे.

-पांडुरंग बिराजदार, वाहतूक पोलीस

पंधरा ते वीस मिनिटांपासून एकाच ठिकाणी थांबलेल्या मुलाला पाहून मला संशय आला. तत्काळ मी त्या मुलाला घेऊन पारस इस्टेटसमोर थांबलेले पोलीस कर्मचारी यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी मातेचा शोध लावला. मायलेकराची भेट झाली. खूप आनंद वाटला.

-सुनील उमदे.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसtraffic policeवाहतूक पोलीस