पांडुरंगाचा महिमा ऐकला अन् आम्ही निघालो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 06:30 PM2019-07-04T18:30:18+5:302019-07-04T18:32:22+5:30

गुगल वरून माहिती घेऊन गोवा ते पंढरपूर असे पायी प्रवास करणारे जिवलग मित्र

Panditanganga's glory was heard and we left! | पांडुरंगाचा महिमा ऐकला अन् आम्ही निघालो !

पांडुरंगाचा महिमा ऐकला अन् आम्ही निघालो !

googlenewsNext
ठळक मुद्देकेवळ नऊ दिवसात पार केले ३५० किमीचे अंतरआता चंद्रभागा वाळवंटात पवित्र स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेणार असल्याचे तेजसिंग बायल आणि प्रसाद परब या मित्रांनी सांगितले

पंढरपूर :  गुगल वरून पंढरपूरच्या पांडुरंगाचा महिमा ऐकला अन दोन महिन्यापूर्वी ठरवले की यावर्षी आपण पायी चालत पांडुरंगाच्या दर्शनासाठी जायचे.  २५ जून रोजी पंढरपूरच्या दिशेने पायी वाटचाल सुरू ठेवली आणि केवळ ९ दिवसात सुमारे ३५० किलोमीटरचे अंतर पार करीत ४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता आम्ही पंढरपुरात पोचलो आता चंद्रभागा वाळवंटात पवित्र स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेणार असल्याचे तेजसिंग बायल आणि प्रसाद परब या मित्रांनी सांगितले.

पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे एवढीच माहिती गुगलवर मिळाली. अधिक सर्च केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र असल्याचे कळाले. पंढरपूरला कसे जायचे मार्ग माहीत नव्हता, मात्र गुगल मॅप चा आधार घेत आज पंढरीत आल्याचे या मित्रांनी सांगितले.

Web Title: Panditanganga's glory was heard and we left!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.