पंढरीत ८९२ लोकांना मिळणार हक्काचे घर; सॉफ्टवेअरने नाकारले २२ जणांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 10:34 PM2021-03-08T22:34:20+5:302021-03-08T22:34:56+5:30

पंतप्रधान आवास योजनेची लॉटरी; ९१४ जणांनी केले होते अर्ज

In Pandhar, 892 people will get their rightful home; The software denied 22 people | पंढरीत ८९२ लोकांना मिळणार हक्काचे घर; सॉफ्टवेअरने नाकारले २२ जणांना

पंढरीत ८९२ लोकांना मिळणार हक्काचे घर; सॉफ्टवेअरने नाकारले २२ जणांना

Next

पंढरपूर : पंढरपूर येथे होत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील ८९२ घरे पूर्ण झाली होती. त्या घरांसाठी आलेल्या ९१४ अर्जांची सोडत सोमवारी काढण्यात आली आहे. यामध्ये सॉफ्टवेअरने २२ जणांना नाकारले तर ८९२ जणांचे अर्ज मान्य झाले आहेत. यामुळे २२ जणांचे घरांचे स्वप्न लांबणीवर पडले आहे, तर ८९२ लोकांना हक्काचे घर मिळणार असल्याचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सांगितले.

पंढरपूर नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या लॉटरीची सोडत संगणकावर काढण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नगराध्यक्षा साधना भोसले, उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, माजी नगरसेवक नागेश भोसले, नगरसेवक गुरुदास अंभयकर, सुजित सर्वगोड, डिराज सर्वगोड, विक्रम शिरसट, नवनाथ रानगट उपस्थित होते.

पंतप्रधान आवास योजनेतील घर मिळावे यासाठी २०४५ जणांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ९१४ जणांनी १० हजार रुपये भरले होते. यामुळे ८९२ घरांची लॉटरी सोडत २६ जानेवारीला होणार होती. मात्र घरांची लॉटरी सोडत काही कारणाने रद्द करण्यात आली होती.

शासनाच्या परवानगीने घरांची सोडत सोमवारी करण्यात आली. जादा अर्ज आलेल्या २२ लोकांची नावे बाजूला काढण्यात आली आहेत. मात्र काही कारणाने ८९२ लोकांपैकी काही लोकांची नावे रद्द झाली. त्या ठिकाणी उरलेल्या २२ लोकांना घर मिळणार असल्याचे मानोरकर यांनी सांगितले.


हे आहेत प्रतिक्षेत........

अमोल सर्वगोड, अप्पा सकटे, श्रीकृष्णा जवंजाळ, सुरुज जाधव, दिगंबर ठेंगील, मंजरी जोशी, सतिश सपताल, भारती नवले, रमेश कुलकर्णी, विमल भुईटे, सफराज बादशहा नदाफ, नंदा पत्रकार, बाळासाहेब इंदापुरकर, शांता सोळंखी, नागेश गायकवाड, योगेश मोरे, सुराज रणदीवे, सविता पवार, कैलास खंडालकर, शोभा शिंदे, ज्ञानेश्वर कुलकर्णी, गणेश घुले या २२ लोकांना घरकूल मिळाले नाहीत.

Web Title: In Pandhar, 892 people will get their rightful home; The software denied 22 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.