शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

सोलापुरातील पद्मशाली शिक्षण संस्थेवर पुन्हा सत्ताधाºयांचाच झेंडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 3:55 PM

पद्मशाली शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी दशरथ गोप यांच्या उत्कर्ष पॅनलने सर्वच्या सर्व म्हणजे २५ जागांवर एकहाती विजय मिळविला.

ठळक मुद्देमागील काही दिवसांपासून गाजणाºया ‘पदवीधर’चा मुद्दा येत्या १५ दिवसांत मार्गी लावण्याचे अभिवचन नवनिर्वाचित सदस्यांनी दिले.पद्मशाली शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत समाजाने आणि सभासदांनी आमच्यावर जो विश्वास दाखविला आहे, तो आम्ही सार्थ करून दाखवणार आहोत - दशरथ गोपगेली २० वर्षे पद्मशाली शिक्षण संस्थेला लुटलेला सर्व पैसा गोप यांनी या निवडणुकीत काढला. पैशापुढे आमचे काही चालले नाही - जनार्दन कारमपुरी

सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी दशरथ गोप यांच्या उत्कर्ष पॅनलने सर्वच्या सर्व म्हणजे २५ जागांवर एकहाती विजय मिळविला. मागच्या निवडणुकीत तीन जागांवर विजय मिळविणाºया विरोधकांना एकही जागा राखता आली नाही.

मागील काही दिवसांपासून गाजणाºया ‘पदवीधर’चा मुद्दा येत्या १५ दिवसांत मार्गी लावण्याचे अभिवचन नवनिर्वाचित सदस्यांनी दिले.तत्पूर्वी सकाळी ७.३० वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सकाळच्या सत्रात मतदानासाठी सभासद मोठ्या प्रमाणावर आले होते. सकाळी ९.३० पर्यंत २७७ जणांनी मतदान केले. पद्मशाली शिक्षण संस्था पूर्व भागातील मानाची संस्था असल्याने समाजातील अनेक नेत्यांनी सकाळपासून येथे गर्दी केली होती.

सत्ताधारी उत्कर्ष पॅनल आणि विकास पॅनलच्या उमेदवारांमध्ये सामना होता. प्रवेशद्वारावर येणाºया सभासदांना दोन्ही पॅनलचे उमेदवार आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करीत होते. सकाळी ११.३० च्या सुमारास जवळपास ६१७ म्हणजे ६० टक्के मतदान झाले होते. प्रवेशद्वारावर दोन्ही पॅनलच्या उमेदवारांचे मोठे फलक लावण्यात आले होते. पाच वाजता मतदानाची मुदत संपल्यानंतर सायंकाळी ६ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. ३० कर्मचाºयांनी मिळून मतमोजणीची प्रक्रिया रात्री १०.३० वाजेपर्यंत पूर्ण केली. 

रात्री पावणेअकराच्या सुमारास निकाल जाहीर करण्यात आला. सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे २५ उमेदवार जवळपास शंभराच्या फरकाने निवडून आल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केला. ‘जय मार्कंडेय’च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. एकमेकांवर गुलाल उधळून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. पाच जागांचा प्रस्ताव मान्य केला असता तर बरे झाले असते, अशी पराभूत पॅनलच्या उमेदवारांमध्ये चर्चा होती. रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा देत होते.

विजयी उमेदवार अन् मते- काशिनाथ गड्डम (५५६), पांडुरंग दिड्डी (५५१), दशरथ गोप (५४६़) श्रीनिवास कोंडी (५४३), रमेश विडप (५२४),  गणेश गुज्जा (५२३), श्रीधर चिट्याल (५१२), रमेश बोद्धूल (५११), अशोक चिलका (५१०), मल्लिकार्जुन सरगम (५०७), व्यंकटेश आकेन (५०३), संगीता इंदापुरे (४९९), प्रभाकर आरकाल (४९८), मधुकर कट्टा (४९३), हरीश कोंडा (४९५), श्रीनिवास कटकूर (४९३), नागनाथ गंजी (४९०),  लक्ष्मीकांत गड्डम (४८६), विजयकुमार गुल्लापल्ली (४८३), दिनेश यन्नम ४७८), श्रीनिवास पोशम (४७१), श्रीनिवास जोग (४६०), रमेश केदारी (४५३) प्रसाद पल्ली (४५६),  नागनाथ श्रीरामदास (४२३).सात नवीन चेहरे- या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलच्या वतीने मागच्या विश्वस्त मंडळातील चार चेहºयांना विश्रांती दिली होती. यावेळी नवीन सात चेहºयांची विश्वस्त म्हणून निवड झाली आहे. यामध्ये १) प्रभाकर आरकाल २) रमेश बोद्धूल ३) काशिनाथ गड्डम ४) गणेश गुज्जा ५) श्रीनिवास जोग ७) प्रसाद पल्ली ७) नागनाथ श्रीरामदास यांचा समावेश आहे.नऊ पदवीधर- निवडून आलेल्या संचालकांमध्ये नऊ पदवीधर उमेदवार निवडून आले आहेत. १) रमेश बोद्धूल २) श्रीनिवास जोग ३) अ‍ॅड. श्रीनिवास कटकूर ४) मधुकर कट्टा ५) रमेश केदारी ६) हरीश कोंडा ७) प्रा. श्रीनिवास कोंडी ८) रमेश विडप ९) दिनेश यन्नम यांचा समावेश आहे.एकमेव महिला- गत पंचवार्षिक निवडणुकीच्या संचालक मंडळात संगीता इंदापुरे आणि सुलोचना गुंडू या दोन महिलांचा समावेश होता. यावर्षी संगीता इंदापुरे या एकमेव महिला संचालक असल्यामुळे नवीन विश्वस्तांमध्ये महिलांचा टक्का घसरला आहे.

विश्वासास पात्र  ठरणार - गोप- पद्मशाली शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत समाजाने आणि सभासदांनी आमच्यावर जो विश्वास दाखविला आहे, तो आम्ही सार्थ करून दाखवणार आहोत. गेल्या २० वर्षांत संस्थेचा केलेला विकास लोकांनी मान्य केला आहे. यापुढेही संस्थेला सतत प्रगतिपथावर ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. पदवीधरांना सभासद करून घेण्याचा निर्णय प्रलंबित राहिलेला होता. आता संपूर्ण पॅनल आमचा आल्याने पंधरा दिवसांत पदवीधरचा मुद्दा मार्गी लावणार असल्याचे पॅनलप्रमुख दशरथ गोप यांनी सांगितले.

धनदांडग्यांपुढे  हरलो - कारमपुरी- गेली २० वर्षे पद्मशाली शिक्षण संस्थेला लुटलेला सर्व पैसा गोप यांनी या निवडणुकीत काढला. पैशापुढे आमचे काही चालले नाही. सभासदांना कोट्यवधी रुपये वाटून हा विजय मिळविलेला आहे. आमच्याकडे पैसा नव्हता म्हणून आम्ही पराभूत झालो आहोत. अनेक वर्षांनंतर आलेली परिवर्तनाची ही संधी आता गेली आहे. त्यामुळे पुढचे परिवर्तन किती वर्षांनी होईल किंवा नाही, हे सांगता येणार नाही, असे विरोधी विकास पॅनलचे जनार्दन कारमपुरी म्हणाले.

टॅग्स :Solapurसोलापूर