शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांकडे एफआरपीची १५७ कोटी थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 14:49 IST

एकीकडे साखर आयुक्तांनी कारवाईचे आदेश काढायचे व दुसरीकडे सहकार मंत्र्यांनी कारवाईला स्थगिती द्यावयाची, असा लुटुपुटूचा खेळ सुरू आहे.

ठळक मुद्दे १३ साखर कारखान्यांनी मात्र अद्यापही एफआरपीप्रमाणेही शेतकºयांना पैसे दिले नाहीतसिद्धेश्वर व भीमा (टाकळीसिकंदर) या साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार मालमत्ता जप्तीची कारवाई

सोलापूर: जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांकडे मागील ऊस गाळप हंगामातील ‘एफआरपी’ची (किमान आणि वाजवी दर) १५६ कोटी ९३ लाख ५ हजार रुपये देणे असल्याची माहिती विभागीय सहसंचालक (साखर) यांनी दिली आहे. एकीकडे साखर आयुक्तांनी कारवाईचे आदेश काढायचे व दुसरीकडे सहकार मंत्र्यांनी कारवाईला स्थगिती द्यावयाची, असा लुटुपुटूचा खेळ सुरू आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांनी मागील वर्षी साखर हंगाम सुरू केला होता. या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपल्यानंतर १४ दिवसांत ऊस उत्पादकांचे पैसे देणे बंधनकारक होते. मात्र या मुदतीत कोणत्याही साखर कारखान्याने पैसे दिले नाहीत, मात्र उशिराने १८ साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे व एफआरपीपेक्षा अधिक रक्कम शेतकºयांना दिली आहे.

 १३ साखर कारखान्यांनी मात्र अद्यापही एफआरपीप्रमाणेही शेतकºयांना पैसे दिले नाहीत. यापैकी सिद्धेश्वर व भीमा (टाकळीसिकंदर) या साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांना दिले होते. या आदेशाला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ५ सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. यानंतर साखर आयुक्तांनी मकाई (करमाळा), विठ्ठल रिफार्इंड (करमाळा), मातोश्री लक्ष्मी शुगर (रुद्देवाडी) व गोकुळ शुगर या साखर कारखान्यांवरही जप्तीची कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले असले तरी याही कारखान्यावर कारवाई होण्याची शक्यता कमीच आहे. 

साखर आयुक्तांचा आदेश जिल्हाधिकाºयांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना अंमलबजावणीसाठी दिला आहे. शेतकºयांची ऊस बिलाची रक्कम थकविणाºया साखर कारखान्यावर कारवाई करण्याबाबत साखर आयुक्त व सहकार मंत्र्यांमध्ये लुटुपुटूचा खेळ सुरू आहे.

सिद्धेश्वरकडे सर्वाधिक थकबाकी

  • - सिद्धेश्वर कारखान्याकडे ४८ कोटी ७ लाख २६ हजार, मातोश्री लक्ष्मी शुगरकडे २३ कोटी ७१ लाख ५२ हजार, श्री विठ्ठल कारखान्याकडे १९ कोटी ४० लाख ४७ हजार, भीमा (टाकळीसिकंदर) कडे १६ कोटी ८५ लाख ६६ हजार रुपये विठ्ठल रिफार्इंडकडे १२ कोटी ४ लाख २४ हजार, गोकुळ शुगरकडे १२ कोटी ७७ लाख ४३ हजार. 
  • - सिद्धनाथ शुगरकडे ५ कोटी २३ लाख, श्री मकाईकडे ४ कोटी १७ लाख, संत दामाजी कारखान्याकडे ४ कोटी २७ लाख ४९ हजार, बबनराव शिंदे (केवड) कारखान्याकडे ३ कोटी १२ लाख, लोकमंगल अ‍ॅग्रो (बीबीदारफळ)कडे ३ कोटी ४८ लाख १५ हजार, कूर्मदास कारखान्याकडे ३ कोटी १० लाख, जय हिंद शुगरकडे ६८ लाख ८८ हजार.

आंदोलन केल्यानंतर आठ दिवसात पैसे देऊ, असे सिद्धेश्वर कारखान्याने सांगितल्याप्रमाणे पैसे देणे सुरू केले आहे. सहकार मंत्र्यांनीच ५ सप्टेंबरपर्यंत ऊस बिल देण्याची मुदत दिली आहे. - महामूद पटेल,अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

साखर, वीज, इथेनॉल व अन्य विक्रीतून पैसे मिळविणाºया साखर कारखान्यांना सहकारमंत्रीच संरक्षण देत आहेत. शेतकºयांना चार पैसे अधिक व वेळेवर मिळावेत, असे कारखानदारांना वाटत नाही.- प्रभाकर देशमुख,जनहित शेतकरी संघटना 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेSubhash Deshmukhसुभाष देशमुखFarmerशेतकरीPuneपुणे