तांदळाच्या गोणीत लपवून ठेवलेले दागिने चाेरट्यांनी लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:23 IST2021-07-28T04:23:44+5:302021-07-28T04:23:44+5:30
कुर्डूवाडी : माढा तालुक्यात कुर्डू येथे कालिदास निवृत्ती सिदवडकर यांनी तांदळाच्या गोणीत लपवून ठेवलेले ७२ हजारांचे दागिने चोरट्यांनी पळविल्याचा ...

तांदळाच्या गोणीत लपवून ठेवलेले दागिने चाेरट्यांनी लांबविले
कुर्डूवाडी : माढा तालुक्यात कुर्डू येथे कालिदास निवृत्ती सिदवडकर यांनी तांदळाच्या गोणीत लपवून ठेवलेले ७२ हजारांचे दागिने चोरट्यांनी पळविल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी त्यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना २२ ते २५ जुलै दरम्यान घडली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार सिदवडकर हे २५ जुलैपूर्वी तांदळाच्या प्लास्टिकच्या गोणीत सोन्या-चांदीचे दागिने ठेवले होते. २५ जुलैला रात्री साडेनऊ वाजता दागिने घेण्यासाठी गेले असता ते गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घरातील सर्वांना दागिन्यांबाबत चौकशी केली असता आढळून आले नाही. त्यांना दागिन्यांच्या चोरीचा प्रकार लक्षात आला. २२ हजार ५०० रुपयांचे गंठण, तीन अंगठ्या, सोन्याचे नेकलेस, सोन्याचे झुबे, तीन जोडी पैंजण असे एकूण ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला.