शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : महायुतीत धुसफूस! "...तर आम्ही २२८ जागा मागायच्या का?", भाजपा नेत्याचा सवाल
2
...तर विधानसभेला आम्ही भाजपलाही मतदान करणार नाही; पंकजा मुंडे समर्थक आक्रमक
3
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
4
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
5
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
6
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
7
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
8
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
9
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
10
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
11
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"
13
Chandrakant Patil : लोकसभेसाठी सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली; चंद्रकांत पाटलांनी केलं कौतुक
14
बस दरीत कोसळली नसती तर सर्वांना गोळ्या घातल्या असत्या; प्रत्यक्षदर्शिंनी सांगितली आपबीती...
15
IND vs PAK मॅचबद्दल प्रश्न विचारला; सुरक्षा रक्षक संतापला, YouTuber ची गोळ्या झाडून हत्या
16
Tata Motorsची मोठी घोषणा, लवकरच कर्जमुक्त होणार JLR, EV साठीही एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स उघडणार 
17
"उद्योगपती सत्ताधाऱ्यांसमोर खरे बोलणे टाळतात, पण राहुल बजाज..."; उदय कोटक यांनी सांगितली आठवण
18
Nitanshi Goel : आईने सोडली सरकारी नोकरी, वडिलांनी बंद केला व्यवसाय; 'फूल कुमारी' अशी झाली स्टार
19
सेन्सेक्स घसरणीसह बंद, Kotak Bank घसरला; ओएनजीसी-PSU बँकांच्या शेअर्समध्ये बंपर तेजी
20
Nokia 3210 4G भारतात लाँच! YouTube सोबतच UPI पेमेंटची सुविधा, किंमत फक्त ३,९९९!

आदेश पोहोचला सगळीकडे, गेला दवाखाना कुणीकडे ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 2:00 PM

हरिदास रणदिवे ।  अरण : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शेटफळ येथे कार्यरत असणारा आयुर्वेदिक दवाखाना अरण येथे स्थलांतर करण्याचा ...

ठळक मुद्देशेटफळचा आयुर्वेदिक दवाखाना झाला बंद : पण अरणमध्ये पोहोचलाच नाहीसोलापूर जिल्हा परिषदेचे एकूण पाच आयुर्वेदिक दवाखाने चालू

हरिदास रणदिवे । अरण : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शेटफळ येथे कार्यरत असणारा आयुर्वेदिक दवाखाना अरण येथे स्थलांतर करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी २६ नोव्हेंबरला काढला. हा दवाखाना तत्काळ अरणला स्थलांतरित करून सेवा चालू करण्याचे आदेश संबंधितांना दिले. या आदेशाला एक महिना उलटून गेला. शेटफळचा दवाखाना तातडीने बंद झाला, मात्र अरणला तो स्थलांतरित झालाच नाही. त्यामुळे ‘गेला दवाखाना कुणीकडे?’ असे विचारण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.

आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्य डी. एन. लाड यांच्याशी या संदर्भात संपर्क साधून विचारणा के ली असता, आपण सध्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत असल्याचे आणि पाटकूलला प्रतिनियुक्तीवर असल्याचे सांगितले. अरणला प्रशस्त इमारत, वीज, मुबलक पाणी या सर्व सुविधा मिळाल्यावर येऊ, असे त्यांनी सांगितले. सध्या अरणला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत उपलब्ध आहे. सध्या तरी या इमातरतीमध्ये हा दवाखाना चालू करता येणे अडचणीचे नाही. नागरिकांचेही हेच मत आहे. 

झेडपी सदस्य भारत शिंदे यांनी या रुग्णालयासाठी पालकमंत्री व अध्यक्षांकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला कागदोपत्री यश आले असले तरी दवाखाना मात्र अद्याप पोहोचलाच नसल्याने तो दुसरीकडे स्थानांतरित तर होणार नाही ना, याची नागरिकांना शंका सतावत असल्याचे बोलले जात असल्याचे सांगण्यात आले़

पाचपैकी चार सुरू...- सोलापूर जिल्हा परिषदेचे एकूण पाच आयुर्वेदिक दवाखाने चालू आहेत. जिंती, शेळवे, गाडेगाव व श्रीपतपिंपरी या चार ठिकाणी सध्या ते कार्यरत आहेत. अरणला जाणार म्हणून शेटफळचा बंद झाला. मात्र अरणलाही पोहोचला नसल्याने सध्या चारच रुग्णालये सुरू आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यdocterडॉक्टरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद