Orchestra bar singer beats for leaving work | काम सोडल्याच्या कारणावरून ऑर्कीस्ट्रा बारच्या गायिकेला मारहाण

काम सोडल्याच्या कारणावरून ऑर्कीस्ट्रा बारच्या गायिकेला मारहाण

ठळक मुद्दे- मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- तू कामावर का येत नाहीस म्हणून केली मारहाण- गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचा तपास सुरू

सोलापूर : काम सोडल्याच्या कारणावरून गायिकेला मारहाण केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकीणसह तिघांविरूद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही मारहाण शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता शिवाजीनगर येथे झाली. 

मालकीण माधोबी, मुलगी परी, पिहु (सर्व रा. फावडे बिल्डिंग शिवाजी नगर, बाळे, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पुजाकुमारी ढोरासहाणी (वय २३, रा. नौतन जगदीशपूर, चंपारण बिहाऱ सध्या शिवाजीनगर बाळे) ही गायिका कोंडी येथील हॉटेल गॅलेक्सी आॅर्केस्ट्रा बारमध्ये कामाला होती. हॉटेल मालकीणसह सर्वजण बाळे येथील फावडे बिल्डिंगमध्ये भाड्याने राहतात. पुजाकुमारी ढोरासहाणी या ऑर्कीस्ट्रा बारमध्ये गायक म्हणून कामाला होत्या. जून २0१९ मध्ये पुजाकुमारी ढोरासहाणी यांनी काही कारणास्तव ऑर्कीस्ट्रा बारमधील काम सोडले होते. काम सोडल्यामुळे मालकीण माधोबी ही त्यांच्यावर चिडून होती. 
शिवाजीनगर येथे एकाच ठिकाणी सर्वजण रहात असल्याने माधोबी ही पुजाकुमारी ढोरासहाणी यांना टोमणे मारत होती. तू पुन्हा कामाला ये अशी दमदाटी करीत होती.

पुजाकुमारी ढोरासहाणी ही सिंगापूर येथे जाण्याच्या तयारीत होती. हा प्रकार माधोबी हिच्या लक्षात आला होता त्यावेळी ती आपल्या मुलांसमवेत शुक्रवारी सायंकाळी पुजाकुमारी यांच्या घरात गेली. तू कामावर का येत नाही असा जाब विचारत मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाणीत पुजाकुमारी ढोरासहाणी जखमी झाली. या प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस नाईक पोळ करीत आहेत. 


 

Web Title: Orchestra bar singer beats for leaving work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.