शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

अत्याचाराच्या विरोधात सोलापूरात सर्वपक्षीय मुकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 2:39 PM

अहमदनगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरण : शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय

ठळक मुद्दे- शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती- उपस्थित मोर्चाकरांच्या भावना तीव्र- मोर्चाला हजारो सोलापूर उपस्थित्

सोलापूर : अहमदनगर शहरातील तोफखाना परिसरात राहणाºया अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात सोलापूरात पद्मशाली समाजाच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मुकमोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा कन्ना चौकमार्गे साखर पेठ, आजोबा गणपती, विजापूर वेस, मार्कडेय मंदीर, सिध्देश्वर प्रशालामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया नराधमास फाशीची शिक्षा व्हावी, आरोपीस मदत करणारे व दबाव टाकणारे यांनाही सहआरोपी करावे, सदर खटला दु्रतगती न्यायालयात चालवावा, सरकारी वकील उज्जवल निकम यांची नेमणुक करावी, पिडीत कुटुंबाला तातडीची २५ लाखांची मदत द्यावी, पिडीत मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा व भविष्यात तिला शासकीय नोकरीची लेखी हमी द्यावी, मुलीला सर्व प्रकारची उच्च दर्जाची वैद्यकीय मदत मिळावी, पिडीत मुलीच्या कुटुंबियास संरक्षण द्यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांना देण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेल्या मुकमोर्चाचे रूपांतर सभेत झाले़ यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे, सरचिटणीस सुरेश फलमारी, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष पांडूरंग दिड्डी, सरचिटणीस दशरथ गोप, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र कमटम, सरचिटणीस महेश धारा, मुकमोर्चाचे निमंत्रक अशोक इंदापुरे,  माजी आमदार नरसय्या आडम, महापौर शोभा बनशेट्टी, भाजपाच्या वृषाली चालुक्य, काँग्रेसचे प्रकाश वाले, बसपाचे आनंद चंदनशिवे, मराठा समाजाचे माऊली पवार, राष्ट्रवादीचे भारत जाधव, संतोष पवार, नगरसेवक गुरूशांत धुत्तरगांवकर, नागेश वल्याळ, फिरदोस पटेल, देवेंद्र कोठे आदी सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते़ 

टॅग्स :SolapurसोलापूरAhmednagarअहमदनगर