शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

वाहतुकीचे नियम मोडणाºया १८ स्कूल बसवर सोलापूरात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 11:05 AM

सोलापूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया १८ स्कूल बसवर आज शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे कारवाई केली. वैध परवाना नसणे, स्कूल बसच्या योग्यता प्रमाणपत्राची संपलेली मुदत, विद्यार्थी वाहतूक धोरणाची पूर्तता न करणे, वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणे आदी प्रकार तपासणीत आढळून आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ...

ठळक मुद्देस्कूल बससह रिक्षावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आलीया मोहिमेसाठी आरटीओने सहा पथके नेमली प्रत्येक पथकात तीन मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश

सोलापूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया १८ स्कूल बसवर आज शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे कारवाई केली. वैध परवाना नसणे, स्कूल बसच्या योग्यता प्रमाणपत्राची संपलेली मुदत, विद्यार्थी वाहतूक धोरणाची पूर्तता न करणे, वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणे आदी प्रकार तपासणीत आढळून आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी दिली. 

 शुक्रवारी १० वाहनांवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली असून, त्यापैकी २ बसवर दंडात्मक कारवाई करून त्या सोडून दिल्या़ ही कारवाई उत्तर व दक्षिण वाहतूक शाखेच्या पथकाने शांती चौक, नवीवेस व आदी शाळा परिसरात केल्या आहेत़  तत्पूर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाने गुरुवारी ८ स्कूल बसवर कारवाई केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली.

शहर वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शालेय विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांची तपासणी करून वाहतुकीचे नियम मोडणाºया स्कूल बससह रिक्षावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ या मोहिमेसाठी आरटीओने सहा पथके नेमली असून, प्रत्येक पथकात तीन मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश आहे.

शुक्रवारी शहर वाहतूक शाखेच्या उत्तर व दक्षिण विभागाच्या पोलीस अधिकाºयांनी शहर आणि उपनगरातील शांती चौक, नवीवेससह इतर ठिकाणच्या १० स्कूल बसवर कारवाई केली़ या कारवाई केलेल्या गाड्या जेलरोड पोलीस ठाण्याशेजारी असलेल्या वाहतूक शाखेच्या कार्यालयापुढे लावण्यात आलेल्या आहेत़ कारवाईतील प्रत्येक गाड्यांना नोटीस (मेमो) देण्यात आल्याचेही वाहतूक शाखेचे कमलाकर पाटील यांनी सांगितले़ या मोहिमेत पोलीस निरीक्षक आनंद माळाले, सहायक पोलीस निरीक्षक संजीव भोसले, पो. कॉ. नागरगोजे, केसकर, बिराजदार, वागज आणि जाधव यांचा समावेश होता.कारवाई अटळ- शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनांवर येत्या काळात कारवाई सुरूच राहणार आहे. वाहतूक शाखा व परिवहन विभाग अशा दोन विभागांकडून संयुक्तपणे कारवाई करण्यात येत आहे़ वाहनधारकांनी वाहन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यास कारवाई अटळ आहे़ वाहतुकीच्या नियमांचे पालन करून कारवाई टाळावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस वाहतूक निरीक्षक कमलाकर पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीसTrafficवाहतूक कोंडीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस