विचार विकसित करण्यासाठी ज्ञानाची दारे उघडा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 14:50 IST2020-09-28T14:50:07+5:302020-09-28T14:50:30+5:30
आपला विकास साधायचा असेल तर सतत शिकत राहणे गरजेचे आहे.

विचार विकसित करण्यासाठी ज्ञानाची दारे उघडा...
व्यक्ती आपल्या क्षेत्रात कितीही पारंगत असला, तरी त्याच्या मनात या भावनेने घर केलेले असते की, यात काहीही अर्थ नाही तर त्याची वैचारिक प्रगती झालीच नाही असे समजावे. शरीरात नव्या पेशी यासाठी निर्माण होतात कारण जुन्याच्या जागी नव्या प्रस्थापित व्हाव्यात. चांगलं काय याचा योग्य निर्णय तोच घेऊ शकतो जो उपजत धारणा आणि मान्यतांचे पुर्नपरीक्षण करण्यास समर्थ आहे. या परिवर्तनशील संसारात प्रत्येक उच्चस्तरावर आपल्या अभिनव संस्करणाच्या बळावर स्वत:ला सिद्ध करायला हवे. ज्ञानाची दारेच कुलूपबंद केली तर नवे विचार विकसित होणार नाहीत.
आपला विकास साधायचा असेल तर सतत शिकत राहणे गरजेचे आहे. जन्मापासून मरणापर्यत शिकण्याच्या प्रक्रियेचे नावच जीवन आहे. पण कळत-नकळत अनेक नकारात्मक गोष्टींची शिकवण आपल्याला मिळते. लेखक, व्यवसाय आणि डिजिटल प्रकणांतील विशेषज्ञ टॉल्फरच्या मते, २१ व्या शतकातील निरक्षर हे आहेत जे वाचू-लिहू शकत नाहीत तर जे आपल्या बिनकामाच्या शिक्षणाला तिलांजली देऊन आणि दुसºयांदा योग्य गोष्टी शिकण्यास तयार नसतात.
अशाप्रकारे मनात असलेले पूर्व ग्रह आणि कुत्सित धारणाही जीवनात प्रतिबंध उत्पन्न करतात. मन अवांछित भावनांना, शंका, मिथकं, दुराग्रह यांनी भरलेले असेल तर त्यात प्रगतीशील उत्तम आणि चांगल्या विचारांचा शिरकाव कसा होणार मग पुन्हा नैराश्य येईल. जीवनमान ठप्प होईल, आपल्या मनावर ताण असल्याचे जाणवेल. स्वत:चे कल्याण करायचे असेल तर दुराचाराला स्वत:पासून दूर ठेवणे गरजेचे आहे असं फादर रिचर्ड रोहर सांगतात.
कला, कौशल्य किंवा विद्या शिकण्याची अट ही आहे की, आतापर्यंत आपण जे जानतो, विचार करतो, समजून घेतो तेच अंतिम सत्य आहे असे मानले पाहिजे आणि त्याचे पुर्नपरिक्षण करण्यात मागे हटायला नको तर चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी तत्पर राहायला हवे. उपलब्ध असलेल्या मान्यता आणि मूल्य यांना श्रेष्ठ तसेच असंशोधनीय मानताना यांना कुरवाळत बसण्याचा अर्थ असा आहे की, नव्याच्या प्रती संशय किंवा दुजाभाव असणे.
- ह.भ.प. विनायक महाजन महाराज
सोलापूर