Only those whose lives were politicized were handed over to the police - Ravikant Tupkar | ज्यांच्या जीवावर राजकारण केले त्यांनाच पोलिसांच्या ताब्यात दिले - रविकांत तूपकर

ज्यांच्या जीवावर राजकारण केले त्यांनाच पोलिसांच्या ताब्यात दिले - रविकांत तूपकर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार सचिन शिंदे यांच्या प्रचारार्थ तपकिरी शेटफळ, तनाळी येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष दामोदर इंगोले, माजी उपसभापती विष्णुपंत बागल, युवा आघाडी संघटक शहाजहान शेख, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, युवा आघाडी प्रवक्ता रणजित बागल, गीतांजली बागल, सोमनाथ घोगरे, नानासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते. कारखानदारांविरूद्ध सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा अशी यावेळची लढाई आहे. या लढाईमध्ये मतदार स्वाभिमानीला साथ देतील, असा विश्वास तुपकर यांनी व्यक्त केला.

स्वाभिमानी यापुढील काळात अधिक आक्रमक होणार

केंद्रातील भाजपप्रणीत एनडीए सरकार, राज्यातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी यापुढील काळात अधिक आक्रमक होणार असल्याचे माजी उपसभापती विष्णूपंत बागल यांनी सांगितले.

Web Title: Only those whose lives were politicized were handed over to the police - Ravikant Tupkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.