शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सहकारमंत्र्यांच्या सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत फक्त वीस टक्के शेतकºयांनाच मिळाला कर्जमाफीचा लाभ, ग्रीन यादीत ६५ हजार शेतकरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 2:33 PM

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : जिल्ह्यातील कर्जदार ४ लाख ३० हजार शेतकºयांपैकी आतापर्यंत ८३ हजार ३८३ शेतकºयांनाच कर्जमाफी मिळाली असून, एकूण कर्जदार शेतकºयांचा विचार केला असता कर्जमाफीचा फायदा मिळालेल्या शेतकºयांची टक्केवारी २० टक्क्यांच्या जवळपास आहे. ‘ग्रीन’ ‘यलो’ व मिसमॅच यादीतील शेतकºयांची संख्या अडीच लाखांपर्यंतच जाते. यामध्ये ग्रीन यादीत ६५ ...

ठळक मुद्देकर्जमाफीच्या प्रतिक्षेतील शेतकºयांची संख्या एकलाखापर्यंत आहे.जिल्ह्यातील कर्जदार ४ लाख ३० हजार शेतकºयांपैकी आतापर्यंत ८३ हजार ३८३ शेतकºयांनाच कर्जमाफी मिळालीएकूण कर्जदार शेतकºयांचा विचार केला असता कर्जमाफीचा फायदा मिळालेल्या शेतकºयांची टक्केवारी २० टक्क्यांच्या जवळपास आहे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : जिल्ह्यातील कर्जदार ४ लाख ३० हजार शेतकºयांपैकी आतापर्यंत ८३ हजार ३८३ शेतकºयांनाच कर्जमाफी मिळाली असून, एकूण कर्जदार शेतकºयांचा विचार केला असता कर्जमाफीचा फायदा मिळालेल्या शेतकºयांची टक्केवारी २० टक्क्यांच्या जवळपास आहे. ‘ग्रीन’ ‘यलो’ व मिसमॅच यादीतील शेतकºयांची संख्या अडीच लाखांपर्यंतच जाते. यामध्ये ग्रीन यादीत ६५ हजार ५०० शेतकरी आहेत. कर्जमाफीच्या प्रतिक्षेतील शेतकºयांची संख्या एकलाखापर्यंत आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीची प्रक्रिया अगदी संथगतीने सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत जिल्हा बँकेच्या ५१ हजार ७७५ व राष्टÑीय बँकांच्या ३१ हजार ६०८ अशा एकूण ८३ हजार ३८३ शेतकºयांच्या बँक खात्यावर  ४५१ कोटी ५६ लाख ३८ हजार ६९९ रुपये जमा झाले आहेत. शासनाने सर्वप्रथम ग्रीन यादीला प्राधान्य दिले होते. या ग्रीन यादीत जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्टÑीय बँकांचे एक लाख ४८ हजार ८८३ शेतकºयांचा समावेश होता. ही यादी बँकांनी तपासून शासनाकडे पाठवली होती. त्यापैकी ८३ हजार ३८३ शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. यामध्ये दीड लाखापर्यंतचे थकबाकीदार, नियमित पैसे भरणारे व दीड लाखावरील थकबाकीदार शेतकºयांचा समावेश आहे.-----------------------------चार लाख ३० हजार शेतकरी कर्जदार...च्जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दोन लाख २० हजार व राष्टÑीय बँकेचे दोन लाख १० हजार कर्जदार शेतकरी असल्याचे सांगण्यात आले. कर्जदार चार लाख ३० हजार शेतकºयांपैकी २० टक्के शेतकºयांनाच आतापर्यंत कर्जमाफी मिळाली असून यलो व मिसमॅच यादीतील पात्र शेतकºयांची संख्या पाहता जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा कमीच शेतकºयांना कर्जमाफी होईल, असे आकडेवारी सांगते. च्जिल्ह्यात मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार एकूण ६ लाख ६७ हजार शेतकरी असून त्यापैकी ५२ हजार शेतकरी हे १० आर पेक्षा कमी क्षेत्र असल्याने कर्ज घेण्यासाठी अपात्र आहेत. ----------------------अडीच लाखांपैकी किती पात्र?जिल्ह्यातील ‘ग्रीन’ यादीतील एक लाख ४८ हजार ८८३ शेतकरी कर्जमाफीला पात्र झाले. ‘यलो’ यादीतील जिल्हा बँकेच्या ११ हजार १४० पैकी अवघे ३२३२ शेतकरी पात्र झाले. राष्टÑीय बँकांची ‘यलो’ यादी जिल्हा बँकेपेक्षा कमी आहे. ‘मिसमॅच’मधील ९४ हजार ४६४ पैकी तपासणीत किती पात्र होतील,त्यावर कर्जमाफीला पात्र असलेल्या शेतकºयांची संख्या अवलंबून आहे.--------------------- जिल्हा बँकेला आलेल्या ‘यलो’ यादीतील ११ हजार १४० शेतकºयांपैकी तपासणीत पात्र झालेल्या ३२३२ शेतकºयांचीही यादी शासनाकडेच कर्जमाफीसाठी पाठविली आहे. राष्टÑीय बँकांच्या ‘यलो’ यादीची आकडेवारी उपलब्ध नाही च्कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरलेल्या परंतु बँक व शेतकºयांच्या अर्जातील माहिती जुळत (‘मिसमॅच’) नसलेल्या जिल्हा बँकेच्या ४७ हजार ११ व राष्टÑीय बँकेच्या ३८ हजार ६५७ अशा ९४ हजार ४६४ शेतकºयांची तपासणी सुरू आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुख