शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

कांद्याला सोलापुरात प्रति क्विंटल कांद्याला नऊ हजारांचा भाव मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 12:06 PM

नाशिकपेक्षाही अधिक दर; पावसाने झोडपल्यामुळे आवक झाली कमी

ठळक मुद्देसोमवारी सोलापूर बाजार समितीत क्विंटलला ९ हजार रुपये इतका दर मिळालालासलगाव बाजार समितीत सर्वाधिक ६ हजार ८०२ रुपयाने कांद्याची विक्री झालीसोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक ११ हजार ६४२ क्विंटल इतकी झाली होती

सोलापूर: पावसाने झालेल्या नुकसानीमुळे आवक फार अशी वाढत नाही. यामुळे कांद्याच्या दरात वरचेवर वाढ होत असून सोमवारी सोलापूरबाजार समितीत क्विंटलचा भाव ९ हजारांवर पोहोचला. सोलापूर पाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील उमराणा बाजार समितीत ८ हजार ६०१ रुपये इतका दर मिळाला आहे.

राज्यातील कांदा पीक अतिपावसामुळे नुकसानीत आले आहे. कांदा पिकांतील अक्षरश: पाणी हटेना झाले आहे. अगोदर लागवड झालेल्या कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकºयांना औषध फवारणीवर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागला आहे. मोठा खर्च करुन वाचविलेला कांदा धो-धो पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे नवा कांदा बाजारात फारच कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे जुन्या कांद्याचा वरचेवर भाव वाढत आहे.

सोमवारी सोलापूर बाजार समितीत क्विंटलला ९ हजार रुपये इतका दर मिळाला. नाशिक जिल्ह्यातील उमराणा बाजार समितीत सर्वाधिक ८ हजार ६०१ रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. अहमदनगर बाजार समितीत क्विंटलला ८ हजार तर चांदवड बाजार समितीत ७ हजार ५०० रुपये दराने कांदा विक्री झाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ८ हजार १०० रुपयाने तर लासलगाव बाजार समितीत सर्वाधिक ६ हजार ८०२ रुपयाने कांद्याची विक्री झाली.------------सर्वाधिक आवक पिंपळगाव(ब)

सोलापुरात सोमवारी सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक ११ हजार ६४२ क्विंटल इतकी झाली होती. उमराणा बाजार समितीत ८ हजार ५०० क्विंटल, लासलगाव बाजार समितीत ६५० ट्रॅक्टर कांदा विक्री झाला. सर्वाधिक आवक पिंपळगाव बसवंत बाजार समितीत १३ हजार ४५५ क्विंटल झाली.

टॅग्स :SolapurसोलापूरonionकांदाMarketबाजारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती