शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रिकाम्या बाटल्यांमधून पडणाºया थेंबभर पाण्यावर फुलू लागली एक हजार झाडे

By appasaheb.patil | Updated: April 2, 2019 12:53 IST

सोलापूर-विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरील गणेश नाईक प्राथमिक शाळेच्या ३५० विद्यार्थ्यांनी कंबर तलावाशेजारी असलेल्या स्मृती वनातील १ हजार झाडांना संजीवनी देण्याचे काम हाती घेतले आहे.

ठळक मुद्देपर्यावरणाचा दृष्टिकोन जपण्याच्या उद्देशाने राबविलेला उपक्रम खरंच गौरवास्पद - शिक्षणाधिकारीवनीकरण विभागाने स्मृती वनात लावलेल्या ८ हजार झाडांपैकी  सध्या १ हजार झाडांवर हा प्रयोग करण्यात आला आहे.या उपक्रमाची पुढील जबाबदारी वनीकरण विभागाच्या सुवर्णा झोळ यांनी स्वीकारली आहे.

 आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : झाडे नुसती लावून चालणार नाहीत, ती जगायला हवीत. त्यांना जगविले तरच उद्याची समृद्धता टिकणार आहे. मागच्या पिढीचा वारसा पुढच्या पिढीने जपायला हवा, असा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सोलापूर-विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरील गणेश नाईक प्राथमिक शाळेच्या ३५० विद्यार्थ्यांनी कंबर तलावाशेजारी असलेल्या स्मृती वनातील १ हजार झाडांना संजीवनी देण्याचे काम हाती घेतले आहे.

या मोहिमेसाठी मुलांच्या पालकांनीही प्रोत्साहन दिले असून,  स्मृती वनाच्या परिसरातील नागरिकही यामध्ये सहभागी होत आहेत.टाकाऊ पाणी बाटलीचा वापर करून झाडांना ठिबक सिंचनासारखे पाणी देण्याची अनोखी शक्कल विद्यार्थ्यांनी लढविली़ या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे़  गणेश नाईक प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आठवडाभरापासून विजापूर रोड परिसरातील हॉटेल व्यावसायिक, भंगार विक्रेते तसेच रस्त्याच्या कडेला विखुरल्या गेलेल्या पाण्याच्या बाटल्या संकलित केल्या.

या बाटल्यांच्या झाकणाला व पाठीमागे छिद्र पाडून त्यात पाणी भरून, बाटलीत सुतळी टाकून छिद्राव्दारे ही सुतळी बाहेर काढून त्या बाटल्या झाडाच्या खोडाजवळ ठेवल्या आहेत़  दोन्ही छिद्राद्वारे थेंब थेंब पाणी रोपांच्या बुडाशी पाझरत आहे. एक बाटलीतील पाणी किमान सात ते आठ दिवसांपर्यंत चालणार अशी व्यवस्था या शाळेतील विद्यार्थ्यांनी केली आहे़  यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊन ऐन दुष्काळात झाडांना पाणी मिळत आहे.

वनीकरण विभागाने स्मृती वनात लावलेल्या ८ हजार झाडांपैकी  सध्या १ हजार झाडांवर हा प्रयोग करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे स्मृती वनातील चिंच, शिस, करंज, नीम, आवळा, खैर, लिंब, सीताफळ,मिडशिंग, बोर, काशीद, कांचन, वड, उंबर, बेल, वावळा, ग्लेरेसिडीया अशा विविध प्रकारच्या हजारो झाडांना ऐन दुष्काळात नवी संजीवनी मिळत आहे. या उपक्रमाची पुढील जबाबदारी वनीकरण विभागाच्या सुवर्णा झोळ यांनी स्वीकारली आहे़  या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका सुरेखा बिराजदार, सहशिक्षक मदन पोलके, सहशिक्षिका स्मिता पाटील, मायादेवी पवार, विजयालक्ष्मी मेनकुदळे, संतोष हिरेमठ, अजिज जमादार, स्नेहल करंडे, प्रिया जवळगी, म्हेत्रे मॅडम, रुपाली लायने, संस्थेचे उपाध्यक्ष स्वामी यांनी परिश्रम घेतले़ 

पर्यावरणाचा दृष्टिकोन जपण्याचा उपक्रम- गणेश नाईक प्राथमिक शाळेच्या संस्था पदाधिकारी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, गुणवत्ता वाढ, नियमित अभ्यासाबरोबरच पर्यावरणाचा दृष्टिकोन जपण्याच्या उद्देशाने राबविलेला उपक्रम खरंच गौरवास्पद आहे असे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, विभागीय वन अधिकारी सुवर्णा माने यांनी व्यक्त केले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरenvironmentवातावरणSchoolशाळाEducationशिक्षण