सोलापूरात खरेदीसाठी आलेल्या दांम्पत्यांचे एक लाखांचे गंठण पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 02:11 PM2018-10-11T14:11:23+5:302018-10-11T14:14:39+5:30

गावी जाता जाता मॉलमध्ये गेलेल्या दांम्पत्याच्या कारमधील एक लाखाचे गंठण चोरीला गेल्याने खरेदी महागात पडल्याचा अनुभव आला.

One lakh of rupees for buying a couple of rupees for sale in Solapura ran away | सोलापूरात खरेदीसाठी आलेल्या दांम्पत्यांचे एक लाखांचे गंठण पळविले

सोलापूरात खरेदीसाठी आलेल्या दांम्पत्यांचे एक लाखांचे गंठण पळविले

Next
ठळक मुद्देअज्ञात चोरट्याने कारची काच फोडुन सोन्याचे गंठण चोरून नेलेफौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पर्समधुन एक लाख रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले

सोलापूर : गावी जाता जाता मॉलमध्ये गेलेल्या दांम्पत्याच्या कारमधील एक लाखाचे गंठण चोरीला गेल्याने खरेदी महागात पडल्याचा अनुभव आला. ही चोरी बुधवारी सायंकाळी ६.१५ ते ६.३0 दरम्यान झाली. शैलेश रमेश नाईकवाडी (वय-३३ रा. वडाची वाडी ता. मोहोळ) हे पत्नी समवेत सोलापूर येथे हॉस्पिटला आले होते.

उपचार करून ते पुन्हा गावी जात असताना त्यांनी भागवत चित्रमंदिर समोरील पार्किंगच्या जागेत कार उभी केली. दोघे खरेदी करण्यासाठी समोरील मॉल मध्ये गेले. दरम्यान अज्ञात चोरट्याने कारची काच फोडुन ड्रायव्हर सिटच्या खाली ठेवलेल्या पर्समधुन एक लाख रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले.

शैलेश नाईकवाडी हे खरेदी करून परत आले असता त्यांना गाडीची काच फुटल्याचे निदर्शनास आले. त्यांनी गाडीतील पर्स पाहिली असता त्यातील सोन्याचे गंठण चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोसई गोडसे करीत आहेत. 

Web Title: One lakh of rupees for buying a couple of rupees for sale in Solapura ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.