एक देश एक रेशन कार्ड ही तर मोदीची गॅरंटी आहे; PM मोदींची ग्वाही

By संताजी शिंदे | Updated: January 19, 2024 12:08 IST2024-01-19T12:07:20+5:302024-01-19T12:08:58+5:30

छोटे मोठया लाखो व्यवसायीकांना यापूर्वी कोणी विचारले नव्हते त्यांना मी विचारतो आहे. मोदींनी यांची गॅरंटी घेतली आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले.

one country one ration card is guarantee said of pm narendra modi in solapur | एक देश एक रेशन कार्ड ही तर मोदीची गॅरंटी आहे; PM मोदींची ग्वाही

एक देश एक रेशन कार्ड ही तर मोदीची गॅरंटी आहे; PM मोदींची ग्वाही

संताजी शिंदे, सोलापूर: पूर्वी देशात रेशनसाठी रांगा लावल्या जात होत्या, आता सर्व नागरिकांना रेशन धान्य सहज सोप केल आहे. महाराष्ट्रातील नागरीक जर चेन्नईमध्ये जात असेल तर तेथेही त्याच रेशन कार्डवर धान्य दिले जात आहे, ही मोदीची गॅरंटी आहे.

नागरिकांना सामाजिक न्याय देण्यावर आम्ही भर दिला आहे. संत रविदास, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरूषांनी सामाजिक न्याय देण्यासाठी आयुष्यभर काम केले. त्यांचा विचार आम्ही घेऊन समाजासाठी काम करीत आहोत. ज्यांना बॅंकेला गॅरंटी देण्यासाठी काही नव्हते, त्यांना आम्ही घरे मिळवून दिले. जनधन योजना चालवून ५० कोटी करोड लोकांना आम्ही बॅंकेशी जोडलो. छोटे मोठया लाखो व्यवसायीकांना यापूर्वी कोणी विचारले नव्हते त्यांना मी विचारतो आहे. मोदींनी यांची गॅरंटी घेतली आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले.

Web Title: one country one ration card is guarantee said of pm narendra modi in solapur