राहुल फटांगडे खून प्रकरणी सोलापुरातून एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 06:08 IST2018-06-14T06:08:05+5:302018-06-14T06:08:05+5:30

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीत राहुल फटांगडे याचा खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला बुधवारी अटक केली आहे.

One arrested from Solapur in connection with the murder of Rahul Phatange | राहुल फटांगडे खून प्रकरणी सोलापुरातून एकास अटक

राहुल फटांगडे खून प्रकरणी सोलापुरातून एकास अटक

पुणे : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीत राहुल फटांगडे याचा खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला बुधवारी अटक केली आहे़ सुरज रणजित शिंदे (वय ३१, रा़ टेंभुर्णी, जि़ सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे़ सुरज मूळचा दौंडमधील भीमनगर येथील आहे़
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी दंगल झाली होती़ त्यात पेरणे फाटा येथून दुचाकीवरून जाणाऱ्या राहुल बाबाजी फटांगडे (वय ३०) याला जमावाने अडवून मारहाण
केली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तिघांना यापूर्वीच अटक केली
आहे. या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे आहे़ फटांगडेचा खून करतानाचा व्हिडीओ सीआयडीच्या अधिकाºयांना एका व्यक्तीने दिला होता. हा व्हिडीओ आणि फोटो सीआयडीने पाच महिन्यांनंतर शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. फोटो व व्हिडीओ व्हायरल झाल्याने सुरज शिंदे हा दौंड येथून सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी येथील भीमनगरमध्ये गेला होता़ याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे यांना मिळाली़ त्यानुसार सापळा रचून पोलीस पथकाने त्याला अटक केली़
पुढील तपासासाठी आरोपीला सीआयडीकडे हस्तांतरीत करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले़

Web Title: One arrested from Solapur in connection with the murder of Rahul Phatange