सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर डॉ. सलवदे यांची निवड

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: January 17, 2023 16:48 IST2023-01-17T16:47:47+5:302023-01-17T16:48:27+5:30

सोलापूर - वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समधील राज्यशास्त्रचे प्राध्यापक डॉ. सिद्राम सलवदे यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ...

On the Management Council of Solapur University Selection of Dr. Salvade | सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर डॉ. सलवदे यांची निवड

सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर डॉ. सलवदे यांची निवड

सोलापूर - वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समधील राज्यशास्त्रचे प्राध्यापक डॉ. सिद्राम सलवदे यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी आणि व्यवस्थापन परिषदेवर निवड झाली आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे नामनिर्देशन केले आहे.

निवडीनंतर वालचंद शिक्षण समूहाच्यावतीने त्यांचा संस्थेचे सचिव डॉ. रणजीत गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे खजिनदार भूषण शहा, विश्वस्त पराग शहा, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, प्राचार्य डॉ. एस. के. शहा, प्राचार्य डॉ. आश्विन बोंदार्डे आदी उपस्थित होते.
 

Web Title: On the Management Council of Solapur University Selection of Dr. Salvade