शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

एकीकडं ‘अमृता वहिनीं’चा पाहुणचार....दुसरीकडं ‘सुभाषबापूं’ची हेलिकॉप्टरवारी !

By सचिन जवळकोटे | Published: November 07, 2022 5:06 PM

लगाव बत्ती...

सचिन जवळकोटे

गेली दोन-अडीच दशकं ‘गडकरी वाड्याचा उंबरठा’ झिजविणाऱ्या ‘सुभाषबापूं’ना उशिरा का होईना नवा शोध लागलेला. भलेही ‘नितीनभाऊ’ दिल्लीत बसून आपल्या जिल्ह्यात नवनवीन हायवे तयार करतील, मात्र या चकचकीत रस्त्यांवरून पळणारी ‘लाल दिव्याची गाडी’ देऊ शकतात फक्त ‘देवेंद्रपंत’च; म्हणूनच की काय ‘किचन कॅबिनेट’च्या ‘ओटी भरणा’तून जुळवली नवीन राजकीय समीकरणं. ‘देशमुखां’च्या घरी ‘अमृता वहिनीं’नी घेतला तब्बल सव्वादोन तास पाहुणचार.. तर ‘सुभाषबापू’ फिरले ‘फडणवीसां’च्या हेलिकॉफ्टरमधून जिल्हाभर.. लगाव बत्ती..

‘डीसीएम’ झाल्यानंतर ‘देवेंद्रपंत’ प्रथमच जिल्ह्यात आलेले. ‘सीएम’ असताना हुकलेली शेवटची विठ्ठल पूजा त्यांनी तब्बल चार वर्षांनंतर भरूर काढलेली. खरं तर ‘कार्तिकी’ एकादशी वारकऱ्यांसाठी महत्त्वाची, मात्र ‘पंत दौरा’ म्हणजे जिल्ह्यातील नेत्यांसाठी जणू पर्वणी यात्राच. त्यामुळंच झाडून सारे नेते दाखल. ‘पंतांचे विमान’ सोलापुरात उतरण्यापूर्वी स्थानिक नेते पंढरपूरच्या रेस्ट हाऊसवर पोहोचलेले. देवेंद्रपंत सुटमध्ये फ्रेश होत होते, तेव्हा हॉलमध्ये अकलूजकर, फलटणकर, बबनदादा, समाधानदादा अन् प्रशांतपंत प्रतीक्षेत बसलेले. अक्कलकोटचे ‘सचिनदादा’ही चक्क ‘पवारां’च्या ‘शहाजीभाऊं’शी कुजबुज करू लागलेले. एक आजी, दुसरे माजी; परंतु या साऱ्या गदारोळात ‘सुभाषबापू’ मात्र बाहेर पॅसेजमध्ये एकटेच उभारलेले. पाहणाऱ्यांना ते खटकत होतं, विचित्र वाटत होतं. ‘पंतांच्या कंपू’त त्यांना मिसळायचं नव्हतं की स्वतंत्र स्थान निर्माण करायचं होतं, हे त्यांनाच ठाऊक.

मात्र दुसऱ्याच दिवशी ‘बापूं’ना संधी मिळाली. ‘देवेंद्रपंत’ हेलिकॉप्टर घेऊन परस्पर पुण्याला जाणार, तर ‘अमृता वहिनी’ प्लेननं जाण्यासाठी सोलापुरात येणार, हे कळताच ‘बापूं’नी सकाळी ‘फडणवीस’ कपलला विनंती केली, जाता-जाता होटगी रोडवरच्या बंगल्यात जेऊन जाण्यासाठी. ‘पंतां’नी एकच क्षण विचार केला. ‘वहिनीं’कडं सहेतूक पाहताच त्यांनीही तत्काळ होकार दिला.

मग काय..‘बापूं’चा तत्काळ सोलापूरला निरोप. शुद्ध शाकाहारी मिष्टान्न भोजनाची तयारी केली गेलेली. ‘वहिनी’ एकट्याच सोलापूरला पोहोचल्या. बंगल्यात ‘अमृता वहिनीं’नी त्यांना अगोदर ओवाळलं. डायनिंग टेबलावरच्या अनेक जिनसामधून ‘नाचणीचे पापड’ तेवढे त्यांनी आवडीनं खाल्ले. ‘ऑइल बिलकूल नको’ म्हणणाऱ्या ‘अमृता वहिनीं’नी घरच्या चकली — कौतुकानं आस्वाद घेतला.

सोबतीला ‘योगासन’वाल्या ‘सुधाताई’ही होत्या. ‘आपण रामदेवबाबांच्या कार्यक्रमासाठी चार वर्षांपूर्वी सोलापूरला हेमामालिनींसोबत आलो होतो’ याची आठवणही ‘वहिनीं’नी आवर्जून काढली. जवळपास सव्वादोन तास त्या देशमुखांच्या बंगल्यात पाहुणचार घेत राहिल्या. हे मात्र याचवेळी ‘पंतां’चा प्लॅन बदलला. त्यांचे हेलिकॉप्टर पुण्याला जाण्याऐवजी सोलापूरकडंच निघालं. मग ते दुपारी जेवत नाहीत म्हणून खास त्यांच्यासाठी स्पेशल फळं आणायला खुद्द ‘मनीषभैय्या’ धावले. ‘अमृता वहिनीं’ना विमानतळावर सोडायला ‘देशमुखांची फॅमिली’ही आवर्जून पोहोचली. निघताना ‘वहिनीं’ची ओटीही भरून कुंकू लावलं.

‘फडणवीस दांपत्य’ विमानानं एकत्रच मुंबईकडं रवाना झाले. तिकडं विमान आकाशात झेपावलं, इकडं ‘बापूं’चंही राजकीय विमान हवेत तरंगू लागलं. होय..आजचा दिवस ‘बापूं’साठी खासच ठरला. इकडं वहिनी बंगल्यावरची ‘हॉस्पिटॅलिटी’ पाहून ‘अमृता वहिनी’ खूश होऊन गेल्या होत्या, तर तिकडे मंगळवेढ्याहून बार्शीला ‘देवेंद्रपंतां’नी ‘बापूं’ना स्वत:च्या हेलिकॉप्टरमध्ये घेतलं होतं. बार्शीतूनही सोलापूरला येताना ‘बापू’च त्यांच्यासोबत होते. त्या प्रवासात जिल्ह्यातल्या बऱ्याच गुप्त घडामोडींवर गुफ्तगू झालेलं; मात्र दोघांमध्ये काय चर्चा झाली, याची उत्सुकता थोडीशी दाबून ठेवू या आपण. एकाच वेळी सगळं नाय पचायचं..लगाव बत्ती..

जाता-जाता : पंढरपूर अन् मंगळवेढ्याच्या कार्यक्रमात ‘विजयकुमार’ दिसले नाहीत म्हणून पक्षातल्या त्यांच्या हितचिंतकांनी लगेच ‘गुप्त मेसेज’ही फॉरवर्ड केले; मात्र बार्शीच्या ‘राजाभाऊं’च्या स्टेजवर ‘विजयकुमार’ बुके घेऊन स्वागताला हजर होते. एकीकडं एक ‘देशमुख’ स्वत:हून दूर चालल्याची आवई उठवली जात असताना दुसरीकडं दुसरे ‘देशमुख’ पद्धतशीरपणे आपल्या जवळ करण्याची ‘चाणक्यनीती’ या दौऱ्यात ‘देवेंद्रपंतां’नी अचूक दाखविली. एका ‘देशमुखां’ना उपवास घडला, तर दुसऱ्या देशमुखांना चक्क ‘कार्तिकी’ पावली.

पंढरपुरात ‘देवेंद्रपंतां’ना भेटणारे ‘बबनदादा’ अन् ‘कल्याणराव’ हे जास्त चर्चेत ठरलेले नेते. ‘आपण विकास आराखडा बैठकीला आलोत, असे आवर्जून सांगणारे ‘बबनदादा’ रात्री ‘पंतनगरी’तही ‘प्रशांतपंतां’च्या ‘डीनर’ला आवर्जून उपस्थित होते. आता इथं त्यांच्या चिरंजीवांच्या म्हणजे रणजितसिंहांच्या पॉलिटिकल करिअरचा आराखडा बनविण्यात ते मश्गुल असावेत. नाहीतरी ‘बबनदादां’ची जबाबदारी ‘खासदार निंबाळकरां’नी घेतलेली; जसं ‘अनगरकरां’च्या फॅमिलीची बार्शीच्या ‘राजाभाऊं’नी स्वीकारलेली.

असो. रात्री ‘पंतां’सोबत ‘डीनर’ करणारे हे ‘बबनदादा’ दुसऱ्या दिवशी ‘घड्याळ पार्टी’च्या ‘लंच’ला शिर्डीत हजरही. सोबतीला ‘अनगरकर’ पाटील - कदाचित शिबिरात समोर स्टेजवर ‘पक्षवाढी’चे भाषण सुरू असताना ‘पाटलां’नी ‘शिंदें’ना नक्कीच विचारलं असणार, ‘काय दाजीऽऽ तारीख मिळाली का तिकडच्या प्रवेशाची? काय म्हणाले पंत ?’ लगाव बत्ती..

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणBJPभाजपा