Offer of police to the vehicle holders without any reason in Solapur | coronavirus; सोलापुरात विनाकारण फिरणाºया वाहनधारकांना पोलीसांचा प्रसाद

coronavirus; सोलापुरात विनाकारण फिरणाºया वाहनधारकांना पोलीसांचा प्रसाद

ठळक मुद्दे- आसरा चौकात पोलीसांची नाकाबंदी, वाहधारकांना घेतले ताब्यात- जमावबंदीचा आदेश असतानाही बिनधास्त फ़िरणाºया वाहनधारकांवर कारवाई- गर्दी न करण्याचे सातत्याने केले जाते शहर पोलीसांकडून आवाहन

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात १४४ जमावबंदी लागू असतानाही विनाकारण बाहेर फिरणाºया हजारो वाहनधारकांना पोलीसांनी प्रसाद देत ताब्यात घेतले़ शहरातील शिवाजी चौक, सात रस्ता, आसरा चौक आदी परिसरात पोलीसांची नाकाबंदी सुरू आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यात जमावबंदी १४४ कलम लागू केला आहे़ अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने, आस्थापने बंद ठेवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले़ तरीही शहरातील लोक सोमवारी विनाकारक बाहेर पडून गर्दी करण्यास सुरूवात केली होती. वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तात्काळ गर्दी रोखण्यासाठी संबंधित अधिकाºयांना सुचना दिल्या़ त्यानुसार पोलीसांनी ठिकठिकाणी नाकाबंदीच्या माध्यमातून वाहनांची तपासणी केली़ शिवाय विनाकारण शहरात एकडे तिकडे फिरणाºया वाहनधारकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून बसविले.
गरज असेल तरच बाहेर निघा..विनाकारण बाहेर पडू नका़़़स्वत:ची काळजी घ्या..एकमेकांच्या संपर्कात येऊ नका..क़ोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीसांना मदत करा असे आवाहन शहर पोलीस दलाकडून वेळोवेळी शहरवासियांना करण्यात येत आहे.

Web Title: Offer of police to the vehicle holders without any reason in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.