‘ऑनलाइन’ वीज बिल भरणाºयांची संख्या सहा महिन्यांत तीस हजारांनी वाढली !

By Appasaheb.patil | Published: March 19, 2020 05:07 PM2020-03-19T17:07:54+5:302020-03-19T17:10:59+5:30

महावितरण; ५०० रुपयांच्या मर्यादेत ग्राहकांना मिळतेय ०.२५ टक्के सूट

The number of online electricity bill bills has increased by thirty thousand in six months! | ‘ऑनलाइन’ वीज बिल भरणाºयांची संख्या सहा महिन्यांत तीस हजारांनी वाढली !

‘ऑनलाइन’ वीज बिल भरणाºयांची संख्या सहा महिन्यांत तीस हजारांनी वाढली !

googlenewsNext
ठळक मुद्देमहावितरणने लघुदाब वीजग्राहकांना ‘ऑनलाइन’ बिल भरण्यासाठी वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपची सेवाऑनलाइन भरणा करण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश काडर््सचा पर्याय महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपवरून घरबसल्या वीज बिलांचा भरणा करावा

सोलापूर : महावितरणची वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपद्वारे ‘ऑनलाइन’ वीज बिल भरणाºया लघुदाब वीजग्राहकांची संख्या गेल्या सहा महिन्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये ३० हजारांनी वाढली आहे. वीज बिल भरणा केंद्रांतील गर्दी टाळण्यासाठी तसेच रांगेत उभे राहण्याऐवजी शक्यतो वीजग्राहकांनी वीज बिलांचा भरणा घरबसल्या ‘ऑनलाइन’द्वारे करावा, असे आवाहन महावितरणच्या सोलापूर विभागाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपद्वारे वीज बिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ५०० ग्राहकांनी गेल्या आॅगस्ट २०१९ मध्ये वीज बिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला होता. त्या तुलनेत गेल्या जानेवारीमध्ये १ लाख ३१ हजार ग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. यात अकलूज विभागामध्ये २८००, बार्शी विभाग - ५६००, पंढरपूर विभाग - ६८००, सोलापूर ग्रामीण विभाग - ५८०० तर सोलापूर शहर विभागात - ९५०० अशी एकूण ३० हजार ५०० ग्राहकसंख्या सोलापूर जिल्ह्यात वाढली आहे.

‘ऑनलाइन’ बिल भरणा नि:शुल्क- क्रेडिट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीज बिल भरण्यासाठी ‘ऑनलाइन’चे उर्वरित सर्व पर्याय आता नि:शुल्क करण्यात आले आहेत. याआधी नेटबँकिंगचा अपवाद वगळता वीज बिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडिट कार्ड वगळता नेटबँकिंग, डेबिट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीज बिल भरणा आता नि:शुल्क करण्यात आलेला आहे. तरी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

‘आॅनलाईन’ बिल भरल्यास मिळतेय सूट...
लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाइन’ बिल भरण्यासाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंगद्वारे वीज बिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. ही सूट मिळविण्यासाठी संबंधित ग्राहकांकडे वीज बिलांची थकबाकी नसावी तसेच वीज बिलांचा भरणा हा प्रॉम्ट पेमेंट डिस्काऊंटच्या निर्धारित वेळेत करणे आवश्यक आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वत:च्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपवरून घरबसल्या वीज बिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणने लघुदाब वीजग्राहकांना ‘ऑनलाइन’ बिल भरण्यासाठी वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपची सेवा उपलब्ध आहे. आॅनलाईन भरणा करण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश काडर््सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे.
- ज्ञानदेव पडळकर,
अधिक्षक अभियंता, महावितरण 

Web Title: The number of online electricity bill bills has increased by thirty thousand in six months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.